रस्ते असे बनवणार की त्यावर किमान १० वर्ष खड्डे पडणार नाहीत – चंद्रकांत पाटील

खड्डे १५ डिसेंबरपर्यंत बुजवणारच चंद्रकांत पाटील आश्वासनावर ठाम

टीम महाराष्ट्र देशा -पावसात पडलेले खड्डे १५ डिसेंबरपर्यंत बुजवले जातील, असं आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलय.  अनेक नवीन कामही लवकर सुरु होतील आणि आता रस्ते बनवताना त्यावर किमान १० वर्ष खड्डे पडणार नाहीत याची काळजी घेणार असल्याचा दावाही त्यांनी केला. राज्य खडडे मुक्त करणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या ते औरंगाबाद इथं पत्रकारांशी बोलत होते. पावसामुळे रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांच्या दुरुस्तीबद्दल पुन्हा एकदा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आश्वासन दिलंय.

.