मोटिव्हेशनल असणारा ’३१ दिवस’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

  टीम महाराष्ट्र देशा : सध्या मराठी सिनेमासृष्टीत अनेक बॉलीवूडमधील कलाकार आणि दिगदर्शक पदार्पण करताना दिसता आहेत. त्यात आता अजून एका बॉलीवूड दिगदर्शकाची एन्ट्री होणार आहे. आशिष भेलकर हा ‘३१ दिवस’ चित्रपटाच्या माध्यमातून मराठी इंडस्ट्रीत एन्ट्री घेतो आहे. त्याने हिंदीत सहदिग्दर्शक म्हणून मधुर भंडारकर आणि प्रभुदेवा यांच्या सिनेमांचे  सहदिग्दर्शक आपल्या कारकिर्दीला सुरवात केली. ‘हिरोईन’, ‘दिल तो बच्चा है जी’, ‘आर राजकुमार’, ‘फॅशन’, ‘स्वीटी वेड्स एनआरआय’  या सिनेमांसाठी असोसिएट डिरेक्टरची भूमिका पार पाडली. या सिनेमांसाठी बी. एस. बाबू (Filmfinity Productions Pvt Ltd) निर्माते आहेत.

आता ते ‘३१ दिवस’ ही त्यांची कलाकृती घेऊन मराठीत पदार्पण करण्यासाठी तो सज्ज आहे. येत्या २० जुलै रोजी हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून तरुण मनाच्या प्रत्येक प्रेक्षकासाठी हा सिनेमा असल्याचं आशिष सांगतात आणि सिनेमा एंटरटेनिंग असण्यासोबत मोटिव्हेशनल असावा असं त्यांचा आग्रह होता. या सिनेमाच्या माध्यमातून आपल्या भेटीला शशांक केतकर, मयुरी देशमुख, रीना अग्रवाल हे कलाकार भेटीला येणार असून त्यासोबतच सुहिता थत्ते, अशा शेलार, विवेक लागू, राजू खेर हे सहकलाकाराच्या भूमिकेत बघायला मिळतील. मुंबईत काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचं म्युझिक लाँच पार पडलं. या सिनेमातील ‘मन का असे ‘ हे  ‘रोमॅटिक सॉग’ने तरुण प्रेक्षकांवर भुरळ घातली आहे.

शशांक केतकर हा या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘मकरंद’ ही भूमिका साकारणार आहे. धेय्य गाठण्याचं पॅशन हे समोर येणाऱ्या कोणत्याही संकटापुढे कमी होत नाही हेच खरं. या क्षेत्राचं नेमकं कोणतं आकर्षण मकरंदला खुणावतंय हे पाहण्यासाठी एक दिवस काढायला हरकत नाही. चिनार- महेश यांनी या चित्रपटासाठी संगीत दिलं आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात बाहुबली चित्रपटातील अथिरापल्ली धबधब्याच्या लोकेशनवर चित्रित झालेले मराठीत पहिले लव्ह सॉंग.

‘३१ दिवस’ हे कलाक्षेत्राशी निगडित असलेल्या प्रत्येक व्यक्तीला जवळचा सिनेमा आहे. या क्षेत्रात आपल्या नावाचा ठसा उमटवू पाहणाऱ्या प्रत्येकाला मकरंदची गोष्ट आपलीच आहे असं नक्की वाटेल.  ‘होणार सून…’मधल्या श्री या व्यक्तिरेखेमुळे तुफान लोकप्रियता मिळालेल्या अभिनेता शशांक केतकरनं मालिकेनंतर ‘गोष्ट तशी गंमतीची’ या नाटकातुंन त्याने ‘कुणाल ‘ची भूमिका साकारली होती . चारशेहून अधिक प्रयोगांचा टप्पा या नाटकानं गाठला. यानंतर टीव्हीवर चमकण्यापेक्षा त्यानं पुन्हा एकदा रंगभूमीलाच प्राधान्य द्यायचं ठरवलं आहे. ‘आबालाल अडकित्ते आणि मुमताज महल’ या नव्या नाटकातून तो ‘राघव ‘ ही भूमिका साकारत आहे. शशांकने ‘वन वे तिकीट’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. शशांक सोबतच या सिनेमात मयुरी देशमुख, रीना अग्रवाल या दोन अभिनेत्री दिसणार आहेत.

Loading...

मयुरी देशमुख ह्या सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे.  ‘मुग्धा’ ही भूमिका साकारणार आहे. मयुरी ‘खुलता कळी खुलेना’ या सिरीयलच्या माध्यमातून तिने आपल्या करियरयला सुरवात केली. सध्या ‘डियर आज्जो’ हे तीच नाटक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

Loading...

रीना अग्रवाल ‘मीरा’ च्या भूमिकेतून आपल्या भेटीला येणार आहे. रीना अग्रवालने डिस्ने चॅनेल इंडिया शो काय मस्त है लाइफ इन 2009 मध्ये आपले दूरदर्शन पदार्पण केले. रीनाने 2012 मध्ये नंदीन देसाई यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘अजिंठा’ मराठी चित्रपटात अभिनय केला. रीनाने 2012 मध्ये ताराशः द लाऊज इन द लाईझ बरोबर बॉलीवुड पदार्पणही केले. चित्रपटात सविता नावाची एक महिला पोलिस कॉन्स्टेबलची भूमिका साकारली. त्यानंतर, ती टीव्ही शो एजंट राघव-क्राईम ब्रान्चमध्ये न्यायालयीन डॉक्टर आरती मिस्त्री म्हणून बघायला मिळाली. प्रमोशनल जाहिरात कोणा होणार मराठी करोडपती 3 आणि म्युझिक व्हिडिओ रंगी प्रीतीचा यामध्ये देखील दिसले.

Loading...

मकरंद, मुग्धा आणि मीरा ची केमिस्ट्री अनुभवण्यासाठी २० जुलै ला ‘३१ दिवस’ बघायला सिनेमागृहात नक्की जा.

दिग्दर्शक सुबोध भावे घेऊन येत आहे ‘पुष्पक विमान’

पिप्सी’चे सप्तरंगी गाणे प्रदर्शित

1 Comment

Click here to post a comment