भारतीय लष्कर आणि सरकारवर निशाणा साधा, लादेनच्या अल कायदा संघटनेचा दहशतवाद्यांना सल्ला

टीम महाराष्ट्र देशा : काश्मीर वादात आता ओसामा बिन लादेनच्या दहशतवादी संघटनेने भाग घेतला आहे. लादेनच्या दहशतवादी संघटनेचा दहशतवादी जवाहिरीनं काश्मीरसंदर्भात भारताला धमकी दिली असून दहशतवाद्यांना आत्मघातकी हल्ल्याचा सल्ला दिला आहे. तर डोन्ट फॉरगेट कश्मीर, असा संदेशही दिला आहे. दहशतवादी जवाहिरीनं हा सल्ला १४ मिनिटांच्या क्लिपमध्ये दिला आहे.

या क्लिपमध्ये जवाहिरीनं म्हणाला की, माझ्या विचारानं काश्मीरमध्ये मुजाहिद्दीननं एकचित्त होऊन भारतीय लष्कर आणि सरकारवर निशाणा साधला पाहिजे. त्यांना आत्मघातली हल्ल्यांसारखे घातपात घडवून आणावे लागतील. अशानं भारतीय अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होईल, तसेच भारतीय लष्कराला याचा मोठा भुर्दंड पडेल. तसेच डोन्ट फॉरगेट कश्मीर, असा देखील संदेश दिला असून काश्मीरमध्ये लढत असलेल्या दहशतवाद्यांना वाचवायचं असल्याचा इरादा बोलून दाखवला आहे.

भारतासाठी हा सतर्कतेचा इशारा असल्याचं म्हंटल जात आहे. कारण काश्मीर प्रश्न हा दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. तसेच भारतात भाजप सरकार काश्मीर प्रश्नावरून आणि कलम ३७० बाबत आक्रमक भूमिका घेत आहे. त्यामुळे दहशवादी संघटना देखील काश्मीरमध्ये सक्रीय होताना दिसत आहेत.