त्यांना मोहन भागवताना ठरवायचं होत ‘हिंदू दहशतवादी’

mohan bhagwat

वेबटीम : लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी मोदी सरकारला घेरण्यासाठी विरोधकांनी जोरदार तयारी केली आहे . मात्र . ‘टाइम्स नाऊ’ या इंग्रजी वृत्त वाहिनीने दिलेल्या वृत्तामुळे खळबळजनक माहिती समोर आली आहे. त्यामुळे  विरोधी पक्ष ‘बॅकफूट’वर जाण्याची शक्यता आहे. ‘टाइम्स नाऊ’च्या वृत्तानुसार तत्कालीन संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारकडून त्यांच्या अखेरच्या टप्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या नावाचा दहशतवाद्यांच्या यादीत समावेश करण्याचा प्रयत्न करण्यात आला  होता. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारमधील काही मंत्र्यांनी ‘हिंदू दहशतवादा’च्या जाळ्यात भागवत यांना अडकवण्याचा प्रयत्न केल्याच या वृत्तात म्हटले आहे.

अजमेर आणि मालेगाव बॉम्बस्फोटानंतर यूपीए सरकारने यामागे ‘हिंदू दहशतवाद थिअरी’ मांडली होती. या अंतर्गतच मोहन भागवत यांना अडकवले जाणार होते. यासाठी राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) बड्या अधिकाऱ्यावर दबाव टाकण्यात येत होता, असे या वृत्तात म्हटले आहे.

तपास अधिकारी आणि काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना अजमेर आणि इतर ठिकाणी झालेल्या स्फोटांप्रकरणी मोहन भागवत यांची चौकशी करायची इच्छा होती. हे अधिकारी यूपीएतील मंत्र्यांच्या आदेशानुसार काम करत होते. यामध्ये तत्कालीन गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचाही समावेश होता. या अधिकाऱ्यांना चौकशीसाठी भागवत यांना ताब्यात घ्यायचे होते, अशी माहिती ‘टाइम्स नाऊ’ला फाईलमधील नोंदीवरून मिळाली आहे.