दिल्लीत 200 युनिट पर्यंत वीज मोफत, महाराष्ट्रात मात्र भरमसाठ बिले पाठवली जात आहेत

पुणे : कोरोना विषाणूच्या जागतिक महामारीमुळे संपूर्ण भारतात दि.23 मार्च पासून लॉकडाऊन (ताळेबंदी) घोषित करण्यात आली. मुंबईतील उद्योग व्यवसाय या ताळेबंदीच्या काळात पूर्ण बंद राहिले. दुकाने व कार्यालये बंद राहिल्याने व्यावसायिकांना या काळात प्रचंड नुकसान सोसावे लागले आहे. तसेच अनेक नागरिकांचा पगार किंवा उत्पन्नाचे साधन बंद झाले आहे.

एकाबाजूला हे सर्व सुरु असताना वीज कंपनीनं मोठ्या रकमेचं वीज बिल पाठवून ग्राहकांना चांगलाच दणका दिला आहे. जगणे मुश्कील झाले असतानाही उर्जा विभाग मात्र वसुली थांबविण्याचे नाव घेत नसल्याचे दिसत आहे. राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत हे ग्राहकांना दिलासा देतील असे चित्र होते मात्र त्यांनीही दिलासा दिलेला नाही.

गेल्या काही दिवसात वीज बिलांचे आकडे ऐकून ग्राहकांना धक्का बसला आहे. ग्राहक वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये लोकं गर्दी करत असल्याचंही दिसत आहे. पण वीज कंपनीनं कोणालाही वाढवून वीज बिल पाठवलेलं नाही. लॉकडाऊनमध्ये घरातील सगळ्याच व्यक्ती घरी होते. त्यामुळे दिवसभर पंखा किंवा इतर स्वरुपात विजेचा मोठा वापर होता. या काळात वीज बिलं न मिळाल्यामुळे कंपनीला मोठा तोटा सहन करावा लागला. त्यामुळे सुमारे 6000 कोटी रुपये कर्ज घ्यावं लागलं आहे. आमच्या ग्राहकांना अजिबात फसवलं नसल्याचं उर्जा मंत्री नितीन राऊत सांगत आहेत.

एका बाजूला दिल्ली येथील अरविंद केजरीवाल सरकार मागील दोन वर्षांपासून 200 युनिट पर्यंत वीज मोफत देत आहे.सामान्य नागरिकांच्या लोकडाऊन काळातील विजेची बिलं माफ झाल्यास त्यांना मोठा दिलासा मिळणार असल्यामुळे ‘आप’च्या वतीने ही मागणी लावून धरण्यात येणार असल्याचं नुकतेच सांगण्यात आले आहे.

मी डॉक्टर आहे, मला रोहित पवारांच्या बोलण्यात तथ्य वाटत नाही – सुजय विखे

युजीसी’ने आधीचा निर्णय फिरवला; परीक्षांबाबतचे निर्णय हे कुलगुरूंच्या सहमतीनेच – सामंत

बळीराजा संकटात; बोगस बियाणांच्या हजारो तक्रारी