उत्तर प्रदेशात भाजपची लढाई ‘SCAM’ विरोधात – नरेंद्र मोदी

narendra modi narendra modi likely-to-go-for-cabinet-expansion

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय जनता पक्षासाठी शनीवारी मेरठ येथे सभा घेतली. उत्तर प्रदेशच्या जनतेमुळे मी पंतप्रधान झालो. जनतेचा विश्वास कायम ठेवत आपण गेल्य़ा अडीच वर्षात आपण एकदाही देशाचे नाव मलीन होईल अशी कृती केली नाही, असे सांगतानाच उत्तर प्रदेशाला गुंडाराजपासून मुक्त करण्याची वेळ आल्याचे पंतप्रधान म्हणाले.

उत्तर प्रदेशसाठी मला बरेच काही करायचे आहे. पण, उत्तर प्रदेशच्या विकासात अडथळा निर्माण करणारे सरकार इथे बसले आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशचा विकास होऊ शकला नाही असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. पंतप्रधानांनी समाजवादी पक्ष, कॉंग्रेस, अखीलेश यादव आणि मायावती यांचा उल्लेख  ‘SCAM’ असा केला.  म्हणूनच आता आपली लढाई ‘SCAM’ सोबत आहे, असे ते म्हणाले.

आपल्याला ‘SCAM’ पाहिजे की, कमळ हे आता उत्तर प्रदेशच्या जनतेनेच ठरावायचे आहे. भाजपची लढाई ही इतर कोणासोबत नसून ‘SCAM’ सोबत आहे असे पंतप्रधान मोदी म्हणाले. जोपर्यंत ‘SCAM’ पासून सुटका होत नाही. तोपर्यंत उत्तर प्रदेशची खऱ्या अर्थाने सुटका होणार नाही. केंद्र सरकारने उत्तर प्रदेशला कितीही मदत करण्याची इच्छा दाखवली तरी, जोपर्यंत राज्य सरकारची इच्छा होत नाही तोपर्यंत काहीही होऊ शकत नाही.

उत्तर प्रदेशात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न अगदी गंभीर बनला आहे. राजकीय अश्रयाने गुंडगिरी मोठ्या प्रमाणात बोकाळली आहे. ही गुंडगीरी संपवायची आहे. इथल्या लोकांना सुरक्षीत जगणे जगता यायला पाहिजे. आज उत्तर प्रदेशाताली कोणाताही सर्वसामान्य व्यक्ती घरातून बाहेर पडला की, त्याला सुरक्षितपणे घरी परत येईल की नाही याची खात्री नसते.

आपल्या भाषणात मोदी पूढे म्हणाले, काही दिवसांपूर्वी समाजवादी पक्षाचे नेते म्हणत होते, आमुक व्यक्ती गुंडगिरी करतो. आमुक व्यक्ती माफिया आहे. पण, समाजवादी पक्षाने अशाच लोकांना तिकीट दिले आहे. या लोकांचे विचार चांगले नाहीत. गरीब लोकांना आजारपणात मदत व्हावी यासाठी केंद्र सरकारने उत्तर प्रदेशला 4000 कोटी रूपये दिल्याचे सांगायलाही मोदी विसरले नाहीत.