सगळे गरीब दारु पितात, कोंबडी खातात आणि मतं देतात ; उत्तरप्रदेश मधील नेत्याचे मुक्ताफळे

टीम महाराष्ट्र देशा: सगळे गरीब दारु पितात, कोंबडी खातात, मतं देतात आणि दिल्ली, लखनऊमध्ये निवडून जाणारे नेते पाच वर्ष लोकांना कोंबडा बनवून फिरवतात. त्यामुळेच गरीब हे गरीबच राहतात आणि विकासाला मुकत असल्याच वादग्रस्त वक्तव्य उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री आणि सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे नेते ओमप्रकाश राजभर यांनी केले आहे. या वक्तव्याने आता नवा वाद निर्माण होण्याचे चिन्ह आहेत.

ओमप्रकाश राजभर हे नेहमीच आपल्या बेताल वक्तव्याने चर्चेत असतात भाजप जेवढा एका महिन्यात खर्च करते तेवढा खर्च तर आमच्या समुदायातील लोक दिवसभराच्या दारुवर करत असल्याचे वक्तव्य त्यांनी केले होते. त्याशिवाय आमच्या पक्षाचा झेंडा पिवळा आहे आणि आम्ही शंकराचे भक्त आहोत. पिवळ्या रंगाचा जो विरोध करेल त्याला कावीळ होईल असा शाप देऊ हे त्यांचे वक्तव्य चांगलेच वादात सापडले होते