fbpx

योगी सरकार उभारणार शिवस्मारकापेक्षाही उंच प्रभू श्रीरामांचा पुतळा

yogi adityanath on namaj

लखनौ – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यादरम्यानच योगी सरकारने मोठी घोषणा केली आहे. अयोध्येत प्रभू श्रीराम यांची 221 मीटर उंचीची मूर्ती उभारण्यात येणार आहे. शरयू नदी किनारी ही मूर्ती उभारण्यात येणार असल्याची घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे.

उत्तर प्रदेश सरकारने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन श्रीराम यांच्या मूर्तीची घोषणा केली. प्रभू श्रीराम यांची विशाल मूर्ती शरयू नदीच्या किनारी बसविण्यात येईल, या मूर्तीची उंची साधारण 221 मीटर उंच असेल, असे या ट्विटरवर म्हटले आहे. सोबतच, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीचे छायाचित्र प्रकाशित करण्यात आले आहे. त्यासाठी, मराठी कलाकार आणि प्रसिद्ध मूर्तीकार राम सुतार यांनीच साकारलेल्या मूर्तीची प्रतिकृती वापरण्यात येणार आहे. त्यामुळे ही प्रभू श्रीराम यांची ही मूर्ती शिवस्मारकापेक्षाही उंच मूर्ती ठरणार आहे.