fbpx

आरएसएसमुळेचं पोटनिवडणुकीत पक्षाचा पराभव; भाजपा आमदाराचा आरोप

लखनऊ : उत्तर प्रदेशातील कैराना लोकसभा व नुरपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकांत भाजपाला पराभवाला सामोरे जावे लागल्याने, सध्या उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे. मात्र अशा परिस्थितीमध्ये उत्तरप्रदेशमधील भाजपचे दोन आमदार योगी आदित्यनाथ यांच्या मदतीला धावून आले आहेत.

गोपामाईचे आमदार श्याम प्रकाश यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून या पराभवाबद्दल थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जबाबदार धरल आहे. त्यांनी लिहिले आहे की, आधी गोरखपूर व फुलपूर आणि आता कैराना आणि नूरपूर या पराभवाचे आम्हाला दु:ख आहे. नरेंद्र मोदी यांच्या नावाने भाजपाला राज्यात सत्ता मिळाली. पण सरकारची सारी सूत्रे मात्र संघ व संघटना यांच्या हातात असल्याने मुख्यमंत्रीही असहाय्य आहेत.

तसेच ते पुढे म्हणाले की, लोकप्रतिनिधींचे अधिकारी ऐकत नाही. भ्रष्टाचार प्रचंड असून, त्यामुळे लोक नाराज आहेत. मुख्यमंत्री मोकळेपणाने फिरू शकत नाहीत, मनासारखे काम करू शकत नाहीत. अशी स्थिती कायम राहिल्यास भाजपाचे भवितव्य अंधकारमय असेल.त्यामुळे भाजपवर इतर संघटनांचा असलेला प्रभाव कमी करणे गरजेचे आहे.