कामगाराचा मुलगा ते अंडरवर्ल्डचा ‘डॅडी’ अरुण गवळीचा इतिहास

दीपक पाठक : तसं पाहिलं तर मुंबई ही कष्टकऱ्यांची आणि मिल कामगारांची कर्मभूमी, कष्टकऱ्यांना आपल्यात सामावून घेणारं एक शहर. पण, काळ लोटत गेला आणि या शहराची मायानगरी झाली. ही मायानगरी होत असतानाच मुंबईत काही अशा टोळ्यांचा जन्म झाला ज्यांच्या अस्तित्वामुळे परिस्थितीच बदलली आणि रक्तपातही झाला. गँगवॉर, बॉम्ब हल्ले, दंगल आणि शहरावर राज्य करणारे डॉन हे सर्व या शहराने पाहिलंय. अशा या शहराच्या इतिहासातील किंबहुना शहरातील गँगवॉरच्या इतिहासातील एक नाव म्हणजे अरुण गुलाब गवळी उर्फ ‘डॅडी’. डोक्यावर गांधी टोपी, पांढरा शुभ्र शर्ट-पायजमा,झुपकेदार मिशा ,नजरेत आगीच्या ज्वाला, काटक शरीरयष्टी, कायम बॉडीगार्डसच्या गराड्यात असं साधारणतः अरुण गवळीच वर्णन केलं जात . मुंबईत खून,खंडणी धमकावणे यासारख्या अनेक प्रकरणांमध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग असल्याबद्दल नेहमी पोलिसांच्या रडारवर नेहमी असलेले हे नाव. अरूण गवळी हे साध नाव जरी उच्चारले तरी कित्येकजण चळाचळा कापतात ही वस्तुस्थिती आहे.     मुंबईवर राज्य करण्यासाठी ऐंशी व नव्वदच्या दशकामध्ये मोठा संघर्ष सुरु होता .अरुण गवळीची अंडरवर्ल्डमध्ये एन्ट्री देखील एकदम धडाकेबाज झाली.अरुण गवळीचे वडील मध्यप्रदेशातील खांडवामधून कामाच्या शोधात मुंबईमध्ये आले होते. घरची परिस्थिती हालाकीची असल्याने त्यांना काही दिवस दुधाचा व्यवसाय करावा लागला. मध्यमवर्गीय कुटुंबातील भायखळ्याचा हा तरूण त्यावेळी गोदरेज कंपनीत नोकरीला होता. भायखळ्यात वजन असलेल्या रमा नाईकशी त्याची अत्यंत घनिष्ट मैत्री होती. त्याच भागात पारसनाथ पांडे, कुंदन दुबे यांचे दारूचे अड्डे होते. पारसनाथ आणि रमा यांच्या टोळ्यांचे नेहमी खटके उडत असत . रमाला ‘मिसा’ मध्ये कैद करवून देण्यात कुंदन दुबेचा हात असल्याची माहिती आहे. कुंदनने रमाचा भाऊ अरविंदची हत्या केली . त्याचा बदला म्हणून रमाने आधी पारस आणि त्यापाठोपाठ कुंदनचाही खून केला. हे सगळ घडत असताना रमा बरोबर असलेल्या संबंधांच्या संशयावरून गवळीचे नाव या प्रकरणामध्ये गोवले गेले आणि इथूनच त्याच्या गुन्हेगारी कारकिर्दीची सुरूवात झाली.arun gavli untold story in marathi

रमा आणि शरद शेट्टीत झालेल्या एका भूखंडाच्या वादात दाऊदने शरद शेट्टीच्या बाजूने निकाल  दिला. रमा नाईकने संतापून टोळीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि एका नव्या टोळीची स्थापना केली या टोळीची भायखळा, लालबाग, परळ, ताडदेव या परिसरात जबरदस्त दहशत होती .पुढे 21जुलै1988 रोजी पोलिसांशी झालेल्या चकमकीत रमा ठार झाल्यानंतर अरूण गवळी या टोळीचा बॉस बनला.टोळीची सगळी सूत्रे हाती येताच त्याने रमाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी चंग बांधला  . 21 नोव्हेंबर 1988 रोजी सतीश राजेची भर चौकात बुलेटप्रुफ गाडी फोडून गोळ्या घालून हत्या करण्यात आली . केलेली प्रतिज्ञा पूर्ण केल्यामुळे तसेच दाऊदच्या अत्यंत जवळच्या हस्तकाला उडवल्याने अरुण गवळी हे नाव चर्चेत आले.

arun gavli untold story in marathi
दाउद इब्राहीम

क्रौर्याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॅडी अशी अंडरवर्ल्डमध्ये त्याने ख्याती मिळवली . दाऊद इब्राहिम, अमर नाईक आणि अरूण गवळी यांच्या टोळ्यांमधील संघर्षात शेकडो बळी गेले. दररोज दिवसाढवळ्या मुंबापुरीत रक्ताचे अक्षरशः पाट वाहत होते. 1987 च्या सुमारास छोटा राजन आणि दाऊदने दुबई गाठली. अमर नाईकही विदेशात गेला . आता मुंबईत फक्त अरुण गवळी उरला होता . दाऊदने गवळीच्या भावाची हत्या केली. आपल्या भावाच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी डॅडीने दाऊदच्या बहिणीच्या पतीची म्हणजे इस्माइल पारकरची हत्या केली होती असा देखील आरोप आहे . इस्माइल हा हसीना पारकरचा नवरा होता. त्यामुळे दाऊद विरुद्ध गवळी या टोळ्यांमध्ये संघर्ष वाढला .पारकरचा काटा काढल्यामुळे गवळीचा चांगलाच दरारा वाढला याचा फायदा घेत लोकांकडून खंडण्या वसूल करू लागला

arun gavli untold story in marathi
हसीना पारकर आणि दाउद

पाणी डोक्याच्या वर जाऊ लागल्यानंतर मुंबईत प्रदीप शर्मा,विजय साळसकर, प्रफुल्ल भोसले, दया नायक यांच्यासारख्या धडाकेबाज अधिका-यांनी अंडरवर्ल्डचा खात्मा केला. पोलिसांच्या एन्काऊंटरमध्ये सातशेहून अधिक गुंड ठार झाले. पोलिसांनी सुरु केलेल्या या धडक कारवाई नंतर चतुर डॉनने आपला मोर्चा राजकारणाकडे वळवला . तुमचा दाऊद असेल तर आमचा अरूण गवळी आहे, असा इशारा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेनी कौतुक केले . पुढे दोघांमध्ये मतभेद झाले आणि 2002 च्या महापालिका निवडणुकांच्या तोंडावर अखिल भारतीय सेना नावाचा राजकीय पक्षच गवळीने काढला. लोकसभा निवडणुकीत भायखळा मतदार संघातून त्याने चांगली मते घेतली. 2004 सालच्या विधानसभेच्या निवडणुकीत तो निवडून आला. अखिल भारतीय सेना हा त्यचा पक्ष चांगले बाळसे पकडू लागला .  राजकीय पक्ष काढल्यावर त्याला शासकीय संरक्षणाचे कवच लाभावे यासाठी त्याने खूप प्रयत्न केले .

arun gavli with balasaheb

सुनील घाटे, गवळीची मुलगी गीता गवळी आणि  वंदना गवळी हे नगरसेवक म्हणून निवडून आले. गीता गवळी यांना  आरोग्य समितीचे अध्यक्षपद देण्यात आले. मात्र डॉन ला कमलाकर जामसांडेकर याची सुपारी घेणे महागात पडले . ग्रह फिरले आणि  शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांची 30 लाखांची सुपारी घेऊन हत्या केल्याबद्दल गवळीला आता जन्मठेपेची सजा सुनावली आहे. Gawli-family

गवळीने दगडी चाळीमध्ये स्वतःची प्रतिमा रॉबिन हूड प्रमाणे बनवली होती . तो अनेक गरजू लोकांना मदत करत असे . दगडी चाळीतील नागरिकांना पोलिसांपेक्षा लवकर आणि हवा तसा न्याय तो देत असे . त्यामुळेच ज्यावेळी पोलीस कारवाई करण्याकरता चाळीत येत तेव्हा हीच लोक गवळीला पळून जाण्यासाठी मदत करत. अरुण गवळीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बाकीचे सगळे डॉन बाहेर देशात पळून गेले मात्र तो मुंबईतच राहिला आणि गुन्हे करत राहिला. गवळीच्या रोबिन हूड प्रतिमेचा फायदा त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना राजकीय वाटचालीत झाला .

गवळी आणि विजय साळसकर

untold story of don arun gavli
शहीद विजय साळसकर

अख्या मुंबईभर दहशत असणारा हा डॉन त्याच्या आयुष्यात सगळ्यात जास्त मुंबई क्राइम ब्रांचचे पोलीस अधिकारी विजय साळसकर यांना घाबरत असे . १९९७ साली पत्रकार अनाहिता रामास्वामी यांना मारहाण केल्याप्रकरणी साळसकर यांनी अवघ्या चार अधिकाऱ्यांसह दगडी चाळीत जाऊन कॉलर पकडून जीपपर्यंत ओढत नेलं होत. आणि पोलीस स्टेशनला नेवून चांगलीच धुलाई केली होती . साळसकर यांच्या धडक कार्वाहीचा गवळीने चांगलाच धसका घेतला होता कारण दगडी चाळ म्हणजे गवळीचे साम्राज्य, घरात घुसून असा कारवाई करणारा जिगरबाज अधिकारी यापूर्वी चाळीने आणि गवळीने कधीच पहिला नव्हता . त्यानंतर अजून एक किस्सा सांगितला जातो की २००४ साली विधानसभेच्या निवडणुकीच्या मतदानावेळी विजय साळसकर मतदान केंद्राच्या जवळ असल्याच्या धसक्याने अरुण गवळी मतदानासाठी आला नाही . दिवसभर त्यादिवशी अरुण गवळी घराबाहेर निघालाच नाही .

सदा पावले उर्फ सदामामा
अरुण गवळीचा अत्यंत विशासू साथीदार म्हणजे सदा पावले . गवळीचा उजवा हात म्हणून पावले ओळखला जायचा डॉन च्या गैरहजेरीत टोळीचे सगळे व्यवहार तोच पहायचा . गवळी जेव्हा तुरुंगात होता तेव्हा त्याच्याच टोळीतील एकाच्या हत्येची सुपारी पावलेने दिली होती तेव्हा ‘चुकीला माफी नाही’ या उक्तीप्रमाणे अत्यंत क्रूरपणे सदामामाची हत्या करण्यात आली . सदा पावलेच्या शरीराचे छोटे छोटे तुकडे करून कचरा कुंडीत टाकण्यात आले होते .

आशा अरुण गवळी
अरुण गवळीने जुबैदा मुजावर या मुस्लीम तरुणीशी पळून जाऊन लग्न केलं. पुढे जुबैदाने स्वतःच नाव बदलून आशा अस करून घेतल . गवळी जेल मध्ये असताना त्याच्या साम्राज्याचा डोलारा आशाने समर्थपणे पेलला . गवळी आयुष्यभर आशाबरोबर एकनिष्ठ राहिला
मुंबईमधील अंडरवर्ल्डचा बेताज बादशहा सध्या जेलमध्ये आहे कधी फार्लोरजा मिळाल्याची बातमी आल्यानंतर चर्चेत येतो तर कधी सिनेमा बनल्यामुळे. मात्र डॅडीची दहशत ,दरारा आणि रुबाब कायम असल्याचे दिसून येते. मात्र डोक्यावर गांधी टोपी घातल्याने महात्मा गांधींचे विचार डोक्यात शिरतातच, असे नाही हेच खरे

ref- Abid shekh (Crime Reporter)