पद्मश्री मिळवणारा दिलदार चहावाला…

D-Prakash-Rao

विनीत वर्तक : पद्म पुरस्कार मिळणे हे अनेकांच स्वप्न असते. आपल्या कर्तृत्वाने देशाची सेवा अथवा वेगवेगळ्या क्षेत्रात आपली छाप सोडणाऱ्या लोकांना ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. ह्या वर्षी मिळालेल्या पद्मश्री पुरस्काराच्या यादीत एक नाव सर्वांपेक्षा वेगळं नाव दिसलं ते म्हणजे डी. प्रकाश राव ( देवारपल्ली प्रकाश राव). डी. प्रकाश राव हे एक चहावाला आहेत. कटक च्या बख्शी बाजारात चहाचं दुकान लहानपणापासून चालवत आहेत. त्यांचे वडील हे दुसऱ्या महायुद्धात सैनिक म्हणून लढले होते. युद्ध संपल्यावर त्यांनी कटक इकडे चहाच दुकान आपली दोन वेळेची भूक भागवण्यासाठी टाकलं. पण दोन वेळेची भूक भागवताना कठीण जायला लागलं. त्यामुळे तरुण असणाऱ्या डी. प्रकाश राव ह्यांना आपलं शिक्षण मॅट्रिकच्या आधी सोडून आपल्या वडिलांना चहाच्या दुकानात मदत करणं भाग पडलं.

आज ५० वर्षापेक्षा जास्त काळ डी. प्रकाश राव चहाचं दुकान चालवतात. रोज सकाळी ४ वाजता उठून ते चहा विक्री सुरु करतात. पण त्यांचा खरा दिवस उजाडतो तो सकाळी १० नंतर. जेव्हा डी. प्रकाश राव शाळेत जातात ते गरीब विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी. आजूबाजूच्या झोपडपट्टी वस्तीतील ८० पेक्षा जास्त ४ ते ९ वयोगटातील मुले आज त्यांच्याकडे शिक्षण घेतं आहेत. आपलं शिक्षण अर्धवट झाल्याची सल त्यांच्या मनात अनेक वर्ष रुतून होती. आजूबाजूला गरीब लहान मुलांसाठी शाळा नाही हे त्यांच्या लक्षात आलं मग २००० साली त्यांनी एक ‘आशा आश्वासन’ नावाची लहान शाळा उघडली. आजूबाजूच्या झोपडपट्टीतील लोकांना त्यांनी मुलांना शाळेत पाठवण्यासाठी जागरूक केलं. त्यांनी आपल्या पैशातून काही शिक्षकांची नियुक्ती केली. स्वतः ही त्या मुलांना शिकवण्याचं शिवधनुष्य उचललं. ही शाळा सध्या तिसरी इयत्तेपर्यंत आहे. नंतर ते ह्या मुलांना पुढच्या शिक्षणासाठी सरकारी शाळेत प्रवेश घेऊन देतात.

Loading...

आपल्या कमाईचा ५०% हून अधिक हिस्सा डी. प्रकाश राव या मुलांवर खर्च करतात. ज्यात मुलाचं शिक्षण, त्याचं आरोग्य, त्याचं जेवण ह्या सगळ्यांचा समावेश आहे. मॅट्रिकच्या आधीच शाळा सोडलेले डी. प्रकाश राव यांना ८ भाषेचं ज्ञान आहे. ज्यात ओडिया, इंग्रजी, हिंदी, तेलगु, तमिळ, कनडा, मल्याळम आणि बंगाली भाषा येतात. त्याचं हे कार्य इथवर मर्यादित नाही तर डी. प्रकाश राव हे रक्तदाता आहेत. आजवर त्यांनी २१४ पेक्षा जास्त वेळा रक्तदान केलं असून १७ वेळा प्लेटलेट दान केल्या आहेत. ह्या मागची प्रेरणा काय हे सांगताना ते सांगतात, “वयाच्या १७ व्या वर्षी एका आजारामुळे मी थोडा अधू झालो होतो. तेव्हा अशाच एका निनावी माणसाने रक्त दिल्यामुळे माझे प्राण वाचले. तेव्हाच मी शपथ घेतली कि मी जमेल तितकं रक्तदान करणार”. डी. प्रकाश राव त्यावर थांबले नाहीत तर त्यांनी आपल्या मृत्यूनंतर शरीराचे अवयव आणि आपलं पूर्ण शरीर हे दान करण्याचा संकल्प केला आहे.

त्यांच्या कार्याची दखल खुद्द भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ह्यांनी घेतली. डी. प्रकाश राव सांगतात कि एक दिवस पंतप्रधान कार्यालयातील एक अधिकारी माझ्या भेटीला आला. देशाच्या पंतप्रधानांना आपल्याला भेटायचे आहे तेव्हा आपण वेळ कधी देऊ शकता असे विचारत होता. तेव्हा हे सगळं माझ्यासाठी अविश्वसनीय असं होतं.

डी प्रकाश रावांच्या शब्दात सांगायचं झालं तर I could not believe when an officer from the PMO requested me to give time for a meeting with PM. My happiness knew no bounds when I finally met Modi. डी. प्रकाश राव ह्यांच्या निस्वार्थी कार्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी इतके प्रभावित झाले कि त्यांनी आपल्या ‘मन कि बात’ ३० मे २०१८ च्या कार्यक्रमात त्यांचा उल्लेख केला. एक साधा चहा विकणारा विक्रेता ठरवलं तर काय करू शकतो ह्याचा आदर्श डी. प्रकाश राव ह्यांनी संपूर्ण देशापुढे ठेवला आहे. कितीतरी गरीब विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं पवित्र काम त्यांनी केलेलं आहे.

त्यांच्या शाळेत शिकलेले विद्यार्थी हे शिक्षणात हि चमक दाखवत आहेत. अनेक विद्यार्थी शाळेत पहिले येत आहेत तर ‘महेश राव ‘ ह्या एका विद्यार्थ्याला २०१३ ला गोवा इकडे झालेल्या विंड सर्फिंग स्पर्धेत चक्क ६ सुवर्ण पदक मिळालेले आहेत.डी. प्रकाश राव यांच्यासारख्या निस्वार्थी, सेवाभावी व्यक्तिमत्वाला आज पद्मश्री पुरस्कार मिळाल्याने मला वाटते आज पद्मश्री पुरस्काराचा सन्मान झाला आहे.डी. प्रकाश राव यांच्या पुढील प्रवासाला शुभेच्छा !!

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
कोरोनाविरोधात लढण्यासाठी रिलायंस कंपनीने घेतला 'मोठा' निर्णय; केली तब्बल 'इतक्या' कोटींची मदत
#Corona : कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटीव्ह, इंस्टा अकाऊंटवरून केली भावनिक पोस्ट
दारुड्यांसाठी अत्यंत वाईट बातमी...दुकाने सुरु होण्यासाठी पहावी लागणार आणखी वाट
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
कोरोना ( कोव्हिड-१९ ) संसर्गाची भिती कोणाला ?
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?