तो पर्यत भारतात ऑलिम्पिक नकोच – अभिनव बिंद्रा

blank

टीम महाराष्ट्र देशा –  भारत जोपर्यंत किमान ४० सुवर्णपदकं जिंकत नाही तोपर्यंत ऑलिम्पिकचे यजमानपद घेऊ नये अशी स्पष्ट भूमिका बीजिंग ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा याने मांडली. यंदाच्या टाइम्स लिट फेस्टमध्ये अभिनव बिंद्रा सहभागी झाला होता. त्यावेळी अभिनवने क्रीडा क्षेत्राविषयी मत व्यक्त केले.

अभिनव बिंद्राने सांगितले की, सध्या तरी मी ऑलिम्पिकचे यजमानपद आपण घ्यावे याच्या विरोधात आहे. मला वाटतं आपण त्यासाठी अद्याप तयार नाही. ऑलिम्पिकच्या यजमानपदामुळे शहराच्या पायाभूत विकासात वाढ होईल. मात्र, शहरातील पायाभूत विकास ऑलिम्पिकच्या आयोजनाशिवाय होऊ शकतो. भारतीय खेळाडूंवर अधिक गुंतवणूक करण्याची आवश्यकता असल्याचे अभिनव बिंद्राने सांगितले. अॅथलिट खेळाडूंवर अधिक मेहनत घेणे आवश्यक असून आपण त्यांना प्राधान्य देण्याची आवश्यकता असल्याचे अभिनवने म्हटले. आपण ऑलिम्पिकमध्ये कमीत कमी ४० सुवर्णपदक जिंकण्याची क्षमता निर्माण करायला हवी, तोपर्यंत आपण यजमानपद घेता कामा नये अशी भूमिका ही अभिनव बिंद्राने मांडली.