…तोपर्यंत मेगा भरती स्थगित

टीम महाराष्ट्र देशा – मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली. मात्र, हायकोर्टाने याचिकांवर कोणताही निर्णय दिला नाही. या पुढील सुनावणी २३ जानेवारी २०१९ रोजी होणार आहे. म्हणजे २३ जानेवारीपर्यंत मेगाभरतीतून कुठलीच नियुक्ती होणार नाही. सरकारी वकील विजय थोरात यांनी कोर्टात या संदर्भात माहिती दिली.
राज्य सरकारने मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात १६ टक्के आरक्षण दिलं आहे. तसा कायदा देखील राज्य सरकारने पारित केला होता. परंतु त्याला विरोध करणारी याचिका  गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. राज्य सरकारने देखील आरक्षणाच्या बचावासाठी कोर्टात कॅव्हेट दाखल केले आहे. तर आरक्षणाच्या बाजूने नामवंत वकील हरीश साळवे बाजू मांडणार आहेत. आज मुंबई हायकोर्टात आज या याचिकेवर सुनावणी पार पडली आहे. या पुढील सुनावणी २३ जानेवारी २०१९ रोजी होणार आहे.

You might also like
Comments
Loading...