‘ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत, निवडणुका होऊ देणार नाही’ चंद्रकांत पाटीलांचा इशारा

patil

मुंबई : राज्यात सध्या मराठा आरक्षण आणि ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण चर्चेचा विषय बनले आहे. तसेच मराठा व ओबीसी समाजात सरकार विरोधात निराशेचे चिन्ह दिसत आहे. दोन्ही समाज आरक्षणासाठी मोर्चे, आंदोलन करत आहे. विरोधकांनी ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द होण्याला राज्य सरकारचा नाकर्तेपणा जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.

त्यांनी हा ईशार सोशल मिडीयावर पोस्ट करत दिला. ते म्हणले, ‘ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत भाजपा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही !’ असे ते म्हणाले दरम्यान या प्रश्नामुळे ओबीसी समाजात निराशा आहे. त्यावर अनेक ओबीसी नेते आवाज उचलत आहे. तसेच राज्य सरकारने सर्वोतोपरी प्रयत्न केले असून केंद्र सरकारने इम्पेरीकल डेटा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी महाविकास आघाडीतील मंत्री करत आहेत.

आता राज्य सरकारने इम्पेरीकल डेटा मिळवण्यासाठी थेट सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. ओबीसी वर्गाचे राजकीय आरक्षण पूर्ववत करण्यासाठी इम्पेरीकल डेटा मिळणे महत्वाचं असल्याची राज्य सरकारची भूमिका आहे.

महत्त्वाच्या बातम्या