पावसाने त्रस्त असलेल्या बळीराजाचे अश्रू पुसण्यासाठी मदत करा; प्रवीण तरडेंचे भावनिक आवाहन

blank

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात अवकाळी पावसाने शेतकर्यांच्या तोंडाशी आलेला घास हिसकून घेतला आहेत. तसेच सत्ता स्थापनेबाबतच्या बैठका सोडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे नेते शेतकर्यांच्या बांधावर जाऊन विचार पूस करत आहे.

कलाकरांनी देखील शेकऱ्यांना मदत करावी असे आवाहन दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी आवाहन केले. फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून त्यांनी कलाकारांना अवकाळी पावसाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात पुढे करण्याचं आवाहन केलं आहे.

तसेच ‘राज्यात आता राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. त्यामुळे सर्व कारभार आता प्रशासनाच्या हातात आहे आणि प्रशासनाची शेतकऱ्याला सवय नाही. म्हणून जिल्ह्यातील तहसीलदार कार्यालयात शेतकऱ्यांना कशी वागणूक मिळते याची पाहणी आपल्या तालुक्यात जाऊन प्रत्येक कलाकाराने करावी’ असे आवाहन तरडे यांनी केले आहे.

दरम्यान, कोल्हापूर-सांगली येथील पूरग्रस्तांसाठी तरडे यांनी मदतीचा हात पुढे केला होता. येथील नागरिकांसाठी त्यांनी १६ ट्रक अन्नधान्य आणि पाळीव प्राण्यांसाठी २ ट्रक पेडिग्री पाठविली होती.

महत्वाच्या बातम्या