विधानपरिषदेच्या उपसभापती पदी शिवसेनेच्या निलम गोर्हे यांची बिनविरोध निवड

nilam gorhe and uddhav thackry

मुंबई: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती पदी शिवसेनेच्या आमदार निलम गोर्हे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मागील सहा महिन्यांपासून हे पद रिक्त होते. काल महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यानंतर निवडणुकीची याची घोषणा करण्यात आली होती. संख्याबळ बघता यात महाविकास आघाडी चा उमेदवार सहज निवडून येईल अशी परिस्थिती होती पण आता ही.

निवडणूक बिनविरोध झाली आहे. भाजपकडून सुरुवातीला जेष्ठ नेते भाई गिरकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. नवनियुक्त विधानपरिषदेच्या उपसभापती पदी निवड झाल्याबद्दल त्यांंचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले. महाविकास आघाडी च्या नेत्यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

निवडणूकीसाठी असे होते संख्याबळ।
विधानपरिषदेतील पक्षनिहाय संख्याबळ

शिवसेना- १४

राष्ट्रवादी काँग्रेस- ९

काँग्रेस- ८

महाविकासआघाडीतल्या तिन्ही पक्षांचं संख्याबळ ३१ होतंय.

भाजप- २२

शेकाप- १

रासप- १

लोकभारती- १

अपक्ष- ४

भाजपचे आणि इतर पक्षांचे मिळून संख्याबळ २९ होत आहे.

दरम्यान, विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा कालचा पहिलाच दिवस हा वादळी ठरला आहे. ग्राम पंचायतीमध्ये प्रशासक नेमणूक करण्यात आली होती. त्याबद्दल सुधारणा विधेयक मांडण्यात आले. परंतु, भाजपने या विधेयकावर जोरदार आक्षेप घेतले.

ग्रामपंचायत सुधारणा विधेयकाला विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला. ग्रामपंचायत प्रशासक नेमणुकीबाबत उच्च न्यायालयाने निर्णय दिला असताना पुन्हा हे विधेयक का? जो वाद न्यायालयात आहे त्यावर अध्यादेश काढायची घाई का? असा सवाल उपस्थितीत केला होता.

तर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी फडणवीस यांचा दावा खोडून काढला. तुमची माहिती अपूर्ण आहे. 5 वर्ष सरपंच कसा यावा, याबाबत नियम आहे. पण 5 वर्षांनंतर काय करावं याबाबत कायदा नाही, असं हसन मुश्रीफ यांनी सांगितले. परंतु, विरोधकांनी जोरदार गोंधळ करत सभात्याग केले.

महत्वाच्या बातम्या:-

अर्णव गोस्वामी सुपारीबाज पत्रकार, सभागृहात शिवसेना आक्रमक…

आयसीआयसीआयच्या माजी सीईओ चंदा कोचर यांच्या पतीला आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने केली अटक

कंगनाला मुंबई महापालिकेची नोटीस