उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरण; सेंगरची सीतापूर तुरूंगात रवानगी

उन्नाव – उन्नावमधील सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेंगरची रवानगी उन्नाव तुरूंगातून सीतापूरच्या तुरूंगात करण्यात यावी अशी मागणी पीडितेने केली होती. पीडितेच्या मागणीनुसार सेंगरची रवानगी उन्नाव तुरूंगातून सीतापूरच्या तुरूंगात करण्यात आली आहे.

आरोपी सेंगर याला उन्नाव जेलमधून हलवावं यासाठी पीडितेने उच्च न्यायालयात मागणी केली होती. याबाबत उच्च न्यायालयात सुनावणी अजून बाकी आहे, मात्र त्यापूर्वीच प्रशासनाने सेंगरला सीतापूर तुरूंगात हलवलं आहे.

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

आज सकाळीच कुलदीप सेंगरला उन्नाव जेलमधून कडक सुरक्षा व्यवस्थेत सीतापूर तुरूंगात हलवण्यात आलं. सेंगरला उन्नावमधून हलवावं अशी मागणी पीडितेने केली होती. आरोपी सेंगर उन्नावमध्ये राहिल्यास माझ्या आणि माझ्या कुटुंबियांच्या जीवाला धोका असल्याची शंका पीडितेने व्यक्त केली होती. उन्नाव तुरूंगातील काही अधिकारी सेंगरचे नातेवाईक आहेत, त्यामुळे आम्हाला न्याय मिळू शकत नाही, असा आरोप देखील पीडितेने केला होता.

Shivjal