fbpx

२९८ रूपयांत अमर्याद कॉल्स आणि ५६ जीबी डाटा

bsnl

बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी २९८ रूपयात अमर्याद कॉलिंग आणि प्रत्येक दिवसाला एक जीबी असा डाटा प्रदान करणारा नवीन प्लॅन जाहीर केला आहे.

जिओने अतिशय किफायतशीर दरातील प्लॅन जाहीर केल्यामुळे आता अन्य कंपन्यादेखील स्पर्धात्मक प्लॅन जाहीर करत आहेत. यात आता बीएसएनएलची भर पडली आहे. बीएसएनएलने आता २९८ रूपयांचा नवीन प्लॅन जाहीर केला आहेत. याची वैधता ५६ दिवसांची असेल.

या ५६ दिवसांमध्ये कुणीही अमर्याद लोकल आणि एसटीडी कॉल करू शकेल. यासोबत दररोज एक जीबी या प्रकारे ५६ जीबी डाटादेखील यासोबत देण्यात येणार आहे. मात्र बीएसएनएलने अमर्याद कॉलिंगच्या डाटामध्ये कोणतीही एफयुपीची मर्यादा घालून दिली नसली तरी इंटरनेटचा वेग मात्र ८० किलोबाईट प्रति-सेकंद इतका असणार आहे. अर्थात इंटरनेटचा वेग हा अन्य प्लॅन्सच्या तुलनेत संथ असेल.