विद्यापीठातील वादांची मालिका सुरूच ; पगडी पाॅलिटिक्स नंतर आता लोगोवरून वाद

pune university gate

टीम महाराष्ट्र देशा : गेल्या काही दिवसांपासून सावित्रीबाई फुले विद्यापीठात बोधचिन्हावरून आणि पुणेरी पगडी सोहळ्यात वापरली म्हणून चांगलाच वाद रंगला आहे.शनिवारवाड्याचा आणि शिक्षणाचा काही संबंध नाही त्यामुळे शनिवारवाडा असलेले बोधचिन्ह हटवण्याची मागणी सत्यशोधक ओबीसी फेडरेशनने केली आहे.तसेच त्यांनी सावित्रीबाई फुले विद्यापीठासाठी नवीन लोगो तयार केला आहे.त्यामध्ये सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा असलेला लोगो त्यांनी तयार केला आहे.प्रतिमेसह पिंपळाचं पान, फुले पगडी, भिडे वाडा, पुस्तक आणि ज्ञानज्योतीचा समावेश केला आहे.

Loading...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बोधचिन्हाच्या कमळातील शनिवारवाड्याचं चित्र हटवा, त्याजागी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा लावा, अशी मागणी सत्यशोधक ओबीसी फेडरेशनडून करण्यात आली. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सत्यशोधक ओबीसी समाजाचे राज्य संघटक सचिन माळी यांनी ही मागणी केली.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पदवीप्रदान सोहळ्यात पुणेरी पगडीवरून वादंग झाला. पदवीप्रदान समारंभातील गाऊन हद्दपार केला गेला, स्नातकांनी पारंपरिक पोशाख घालावा अशी सिद्धता केली गेली. परंतु पुणेरी पगडीचा आग्रह सक्तीचा ठेवला गेला. यावर विद्यार्थी संघटनांनी पुणेरी पगडीच्या निषेधाची भूमिका घेतली.विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभातील गाऊन आणि पुणेरी पगडी अशी वेशभूषा ही गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे. मात्र, यंदा त्यातील गाऊन हद्दपार करून पारंपरिक कुर्ता वापरण्याचे जाहीर केले होते. यात पुणेरी पगडी मात्र कायम ठेवली, त्यामुळे काही विद्यार्थी संघटनांनी त्याला विरोध दर्शविला होता.

 Loading…


Loading…

Loading...