कुलगुरूंना स्वच्छतेचे वावडे आहे का ?

uni pune1

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी कमवा व शिका योजनेचे विद्यार्थी विद्यापीठातील वसतीगृह,कॅन्टीन व काही महत्वाच्या परीसराची सकाळी 7 ते 9 दरम्यान स्वच्छता मोहिम राबवत असत विशेष म्हणजे यामध्ये माजी कुलगुरू डॉ.वासुदेव गाडे हे स्वत: सहभागी होत असत परंतु डॉ.गाडे यांचा कार्यकाळ संपल्यानतंर मात्र हि मोहीम बंद असल्याची माहिती विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी दिली असून नविन कुलगुरू डॉ.नितीन करमळकर यांना स्वच्छतेचे वावडे आहे का असा सवाल देखील उपस्थित केला आहे.
विद्यापीठातील स्वच्छतेविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागृकता राहवी व परीसर देखील स्वच्छ रहावा या उद्देशाने माजी कुलगुरू डॉ.वासुदेव गाडे यांच्या काळात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी कमवा व शिका तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांकडून विद्यापीठातील वसतीगृहे,कॅन्टीन,आजूबाजूचा परीसर याची स्वच्छता मोहिम राबविण्यात येत असे यामध्ये विद्यार्थ्यांबरोबरच माजी कुलगुरू डॉ.गाडे यांच्यासह विद्यापीठाच्या विविध विभागांचे प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होत असत. त्यामुळे विद्यापीठातील परीसर तर स्वच्छ होतच असे त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये देखील स्वच्छतेविषयी जागृकता निर्माण होत असे.परंतु डॉ.गाडे यांचा कार्यकाळ संपल्यानंतर नविन कुलगूरू डॉ.नितीन करमळकर यांची नियुक्ती झाली त्यांनी 17 मे रोजी विद्यापीठाचा कारभार आपल्या हाती घेतला परंतु त्यांच्या काळात हि मोहीम बंद पडली आहे.त्यामुळे विद्यापीठात सध्या ठिकठिकाणी कचर्‍याचे ढिग दिसून येतात.त्यामुळे नविन कुलगुरूंना स्वच्छतेविषयी काही वावडे आहे का असा सवाल आता विद्यार्थ्यांना पडला आहे.
कुलगुरुंची सारवासारव
“मी सध्या विद्यापीठात राहत नाही त्यामुळे मला या मोहिमेत सहभागी होता आले नाही.विद्यापीठात राहण्यास आल्यानंतर मात्र मी या मोहिमेत सहभागी होणार आहे”.
कुलगुरू डॉ.नितीन करमळकर