‘स्वारातीम’ विद्यापीठातर्फे ऑनलाईन कोर्सेसला नाव नोंदणी करण्याचे आवाहन

नांदेड : भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयांतर्गत सुरु करण्यात आलेल्या व विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरलेल्या स्वयम ‘एनपीटीईएल’ ऑनलाई अभ्यासक्रमाला २५ जानेवारी पर्यंत ऑनलाईन नोंदणी करणे आवशक आहे. असे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील ‘एनपीटीईएल’ समन्वयक डॉ. नितीन दारकुंडे यांनी कळविले आहे.

विद्यापीठातून प्रचलित प्रशिक्षण घेत असतांना आपण नामांकित आयआयटी, आयआयएससी येथील प्रध्यापकाकडून देखील ज्ञानार्जन करू शकतो. हे स्वयम ‘एनपीटीईएल’च्या विविध कोर्सेसचे वैशिष्टे आहेत. कला, वाणिज्य, व्यवस्थापनशास्र, विज्ञान-तंत्रज्ञान, वैद्यकीयशास्र, सामाजिकशास्र, अभियांत्रिकीच्या विविध शाखांमधील सुमारे 500 अभ्यासक्रमाचा‘एनपीटीईएल’ मध्ये अंतर्भाव आहे.

या अभ्यासक्रमला पदवी, पद्युत्तर शिक्षण घेत असलेले विद्यार्थी, तसेच विविध शाखांमधून शिक्षण घेत असलेले विद्यार्थी, शिक्षक, संशोधन विद्यार्थी तसेच विविध शाखांमधून शिक्षण पूर्ण करून नोकरी व्यवसाय करत असणारे परंतु ज्ञानार्जना करण्याची आवड असणारी कोणतीही व्यक्ती ऑनलाई नोंदणी करू शकते. एनपीटीईएल’ ऑनलाई अभ्यासक्रम मोफत आहेत.‘एनपीटीईएल’ ऑनलाई अभ्यासक्रमाला नावनोंदणी करतांना व परीक्षा अर्ज दाखल करतांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या एनपीटीईएल’ चा पर्याय निवडावा व एनपीटीईएलच्या संकेतस्थळाला भेट द्यावी असे आवाहन विद्यापीठाच्या वतीने करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या