fbpx

विद्यापीठ प्रशासनाचे धाबे दणाणले; मंजुळेंना सेट काढण्याचे आदेश

nagraj manjule and univercity ground

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना चित्रपटाच्या शुटींगसाठी मैदान भाड्याने दिले होते. त्यानंतर राज्याचे उच्च शिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी नियमबाह्य पद्धतीने उभारलेला सेट काढण्याचे आदेश दिले होते. मात्र विद्यापीठाने राज्यमंत्र्यांना गांभीर्याने घेतले नव्हते तसेच मैदानातील सेट ‘जैसे-थे’ स्थितीत होता. आता मात्र थेट राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांनी प्रभारी कुलसचिव डॉ. अरविंद शाळिग्राम यांना सेट काढण्याची कार्यवाही तातडीने करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

( अनधिकृत सेट बाबत बोलण्यास कुलगुरू नितीन करमळकर करत होते टाळाटाळ)

nitin karmarkar pune university

राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांनी कार्यवाही तातडीने करण्याच्या सुचना दिल्यानंतर मुजोर विद्यापीठ प्रशासनाचे धाबे दणाणले. त्यांनी नागराज मंजुळेंना सेट काढण्याचे आदेश दिले. तसेच तो न काढल्यास कडक कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे. अनधिकृत सेट बाबत बोलण्यास कुलगुरू नितीन करमळकर हे टाळाटाळ करत होते.

विद्यापीठाने मंजुळे यांच्या आगामी हिंदी चित्रपटाच्या शुटींगसाठी ६ लाख रुपये भाडेतत्वावर मैदान भाड्याने दिले होते. नागराज मंजुळेंवर मेहरबानी करत विद्यापीठाने नाममात्र शुल्क आकारून मैदान शुटींगसाठी दिल्याचा संतापजनक प्रकार समोर आल्यानंतर माध्यमांनी हे प्रकरण उचलून धरले. विद्यापीठाने कुणालाही न जुमानता मंजुळेना मैदान भाड्याने दिले. शासनाच्या अंतर्गत येणारी कोणतेही जमीन भाड्याने द्यायची असेल तर राज्य सरकार, विद्यापीठाची व्यवस्थापन परिषद आणि उच्चशिक्षण संचालनालय यांची परवानगी घेण आवश्यक असते. मात्र कुलगुरूंनी यापैकी कुणाचीही परवानगी न घेता मनमानी करून मैदान भाड्याने देण्याचा परस्पर निर्णय घेतला होता. या प्रकरणाची तक्रार जिल्हाधिकारी कार्यालय आणि उच्चशिक्षण संचालनालय यांच्याकडे करण्यात आल्यानंतर या दोन्ही विभागांनी चौकशी करून विद्यापीठाला नोटीस बजावली होती.