fbpx

विद्यापीठ प्रशासन आणि मंजुळे करत आहेत चालढकल

nagraj and Prof Nitin R Karmalkar

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना पुन्हा एकदा चित्रपटाच्या शुटींगसाठी उभारलेला सेट काढावा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. मात्र नागराज मंजुळे यांनी विद्यापीठाच्या भूमिकेवर अद्याप कोणतेही उत्तर दिले नाही. तसेच मैदानातील सेट अजूनही जैसे-थे स्थितीत आहे. यामुळे विद्यापीठ प्रशासन आणि मंजुळे चालढकल करत असल्याचे स्पष्ट होत आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना चित्रपटाच्या शुटींगसाठी मैदान भाड्याने दिले होते. त्यानंतर राज्याचे उच्च शिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी नियमबाह्य पद्धतीने उभारलेला सेट काढण्याचे आदेश दिले होते. मात्र विद्यापीठाने राज्यमंत्र्यांना गांभीर्याने घेतले नव्हते तसेच मैदानातील सेट ‘जैसे-थे’ स्थितीत होता. आता मात्र थेट राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांनी प्रभारी कुलसचिव डॉ. अरविंद शाळिग्राम यांना सेट काढण्याची कार्यवाही तातडीने करण्याच्या सुचना दिल्या. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने नागराज मंजुळे यांना पत्राव्दारे सेट काढण्याचे तसेच नाही काढल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले.

nagraj movie set

विद्यापीठातील मैदानावर उभारलेला सेट काढण्याचे आदेश फक्त आताच दिले असं नाही याआधी देखील विद्यापीठाने नागराज मंजुळे यांना सेट काढण्याबाबत आदेश दिले होते. यापूर्वी चित्रपटाच्या शूटिंगसाठी नियमबाह्य पद्धतीने उभारलेला सेट ७ दिवसात काढण्याच्या सूचना विद्यापीठाने दिल्या होत्या. मात्र तरी देखील सेट आतापर्यंत काढण्यात आला नाही. मंजुळे सुद्धा विद्यापीठाला गांभीर्याने घेत नसून विद्यापीठाकडून फक्त कारवाई करण्याचा दिखावा होत आहे. त्यामुळे या प्रकरणात नागराज मंजुळेना विद्यापीठाकडूनच पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत आहे  कि विद्यापीठ प्रशासनावर कुणाचा दबाव आहे यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं गुलदस्त्यातच आहेत.

या सर्व घडामोडी होत असताना विद्यापीठ चालढकल करत आहे, कि नागराज मंजुळे? असा देखील प्रश्न निर्माण झाला असून या संदर्भात प्रभारी कुलसचिव डॉ. अरविंद शाळिग्राम यांचाशी संपर्क साधला असता. ते म्हणाले, नागराज मंजुळे यांना सेट काढण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यांनी नाही काढल्यास  कायदेशीर कारवाई करू .

nagraj manjule and univercity ground

साडेसहा लाख रुपयांचं काय झालं?

नागराज मंजुळे यांनी साडेसहा लाख रूपयांचे शुल्क आकारून विद्यापीठाचे मैदान दीड महिन्यांसाठी भाड्याने घेतले होते. मैदान भाड्याने देताना विद्यापीठाने सुद्धा नियम धाब्यावर बसवून फक्त बडी हस्ती आहे म्हणून होकार दिला. मात्र आज ३ महिने उलटले, दीड महिन्यांचा कालावधीही संपला तरी देखील विद्यापीठाला कोणतीही रक्कम मिळाली नाही. त्यामुळे विद्यापीठ प्रशासन आणि मंजुळे यांच्यात गुप्तपणे देवाण-घेवाण झाली का? कि या प्रकरणात काही  मंडळींचे आर्थिक हितसंबंध जपले गेले आहेत याचा लवकरच पर्दाफाश महाराष्ट्र देशा करेल.

2 Comments

Click here to post a comment