नागरिकांच्या मुलभूत प्रश्नासाठी बंगळुरुच्या रस्त्यावर अवतरली जलपरी.

unique-protest-against-pothole-in-bangalore-

मुंबई तुझा बी एम सी वर भरोसा नाही का? असा आवाज देत मुंबईच्या रस्त्याची दैनिय अवस्था एका आरजेने जगासमोर आणली. तेव्हा देशभरात या गाण्याची चर्चा झाली. यानंतर देशभरात विविध आंदोलनाच्या माध्यमातून नागरिकांच्या मुलभूत प्रश्नावर आवाज उठविण्यात आला. बंगळूर मध्ये देखील असच एक अनोख आंदोलन झाल ज्याची देशभरमध्ये चर्चा सुरु आहे.

बंगळुरूमधल्या रस्त्यावरच्या खड्ड्यांविरोधात स्थानिक कलाकारांनी पुकारलेलं एक अनोखं आंदोलन स्ट्रीट आर्टिस्ट बादल नंजुनदासस्वामी आणि कन्नड अभिनेत्री सोनू गोडवा यांनी हे अनोखं आंदोलन केलं. यासाठी बंगळुरुमधल्या एका खड्ड्यातल्या पाण्यात निळा रंग टाकण्यात आला. खड्ड्याला समुद्राचं रुप देण्यात आलं आणि त्यानंतर सोनू गोडवा यांनी खास जलपरीच्या अवतारात इथं आंदोलन केलं.

बंगळुरुमध्ये रस्त्यांची अवस्था फारची बिकट आहे. त्यामुळे बरेच अपघात झाले आहेत. 10 ऑक्टोबरला दुचाकीवरुन जाणाऱ्या एका 21 वर्षीय युवतीचा खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता. अशाच एका अपघातात 54 वर्षीय व्यक्तीला देखील आपले प्राण गमवावे लागले होते. एवढे अपघात होऊनही प्रशासन आजही रस्त्यांबाबत अगदी उदासिन आहे. त्यामुळेच हे अनोखं आंदोलन करुन सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

unique-protest-against-pothole-in-bangalore-
file photo

2 Comments

Click here to post a commentLoading…
Loading...