भाजप मंत्र्याविरोधात बलात्काराचा गुन्हा

नवी दिल्ली : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री राजेन गोहेन यांच्या विरूद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आलाय. आसाम मधल्या नगांव जिल्ह्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस तपास करत आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे घटना आठ महिन्यांपूर्वीची आहे. राजेन गोहेन आणि त्या महिलेची ओळख असून त्यांचं त्या महिलेकडे जाणं येणं होतं.

नगांव च्या पोलीस उपाधीक्षक संबिता दास यांनी महिती देताना सांगितलं की तक्रार आल्यानंतर पोलीसांनी 2 ऑगस्टला गुन्हा नोंदवून घेतला आहे. त्याचा तक्रार क्रमांक 2592-18 असा आहे. भारतीय दंड संहितेनुसार कलम 417(फसवणूक), 376 (बलात्कार) आणि 506 ( धमकी देणं) ही कलमं लावण्यात आली आहेत.

पीडीत महिलेचा जबाब घेण्यात आला असून तीने वैद्यकीय तपासणीस नकार दिला आहे. ही घटना घडली तेव्हा महिलेच्या घरी तीचे कुटूंबिय आणि पती नव्हता अशी माहिती पोलीसांनी दिलीय.

त्यावेळी मोठा भाऊ म्हणून त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला असता तर आज चित्र वेगळ असतं – पंकजा मुंडे

You might also like
Comments
Loading...