‘नीट’ आणि ‘जेईई’ची परीक्षा वर्षातून दोनदा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांची घोषणा

टीम महाराष्ट्र देशा : केंद्र सरकारने इंजिनियरिंग आणि मेडीकलच्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे. ‘नीट’ आणि ‘जेईई’ची परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली. विद्यार्थ्यांना आपला सर्वोत्तम परफॉर्मन्स देता यावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं जावडेकरांनी सांगितलं.

या परीक्षा आता कॉम्प्यूटरवर घेतल्या जाणार असून जेईईची परीक्षा जानेवारी आणि मार्च तर ‘नीट’ची परीक्षा फेब्रुवारी आणि मे महिन्यात घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.इंजिनियरिंग आणि मेडीकल शाखेतील प्रवेशाच्या दृष्टीने जेईई आणि नीट या महत्त्वाच्या परीक्षा असतात. या परीक्षा पूर्वी वर्षातून फक्त एकदाच व्हायची. यामुळे या परीक्षेत चांगले गूण नाही मिळाले तर विद्यार्थ्यांचे संपूर्ण वर्ष वाया जायचे. अखेर हे धोरण बदलण्याचा निर्णय केंद्रीय मनुष्यबळाने घेतला आहे.

यातील सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे ही परीक्षा आता ऑनलाइन होणार आहे. तसेच या परीक्षा आता वर्षातून दोन वेळा घेतल्या जातील. एका परीक्षेत अपेक्षित यश मिळाले नाही तर काही महिन्यांनी होणाऱ्या दुसऱ्या परीक्षेत पुन्हा संधी मिळेल. दुसरी परीक्षा द्याची की नाही, हा सर्वस्वी विद्यार्थ्याचा निर्णय राहील. या दोन परीक्षांंपैकी जो स्कोअर सर्वोत्तम असेन, तोच प्रवेशासाठी ग्राह्य धरला जाईल. . यामुळे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नाही. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) आतापर्यंत ही परीक्षा घेत होती मात्र यापुढे राष्ट्रीय परीक्षा एजंसी (नॅशनल टेस्टिंग एजंसी- एनटीए) ही परीक्षा घेईल.

शहिदांच्या पत्नीला, कायदेशीर वारसांना मिळणार शेती योग्य जमीन