का लढणार नाहीत उमा भारती यापुढे कोणतीही निवडणूक ?

Uma Bharati

नवी दिल्ली: बुंदेलखंडच्या प्रभावशाली आक्रमक हिंदूत्ववादी नेत्या अशी त्यांची ओळख असणाऱ्या भाजपच्या जेष्ठ नेत्या व केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी यापुढे कोणतीही निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. अशी घोषणा त्यांनी माध्यमांशी बोलताना केली.

उमा भारती यांनी वय आणि आरोग्याचा हवाला देत, मी कोणतीही निवडणूक आता लढवणार नाही. पण मी पक्षासाठी कायमच कार्यरत राहीन, अशी ग्वाही दिली. त्या म्हणाल्या, दोन वेळा मी खासदार राहिले आहे आणि खूप काम पक्षासाठी केले असल्यामुळेच एवढ्या कमी वयात मला शारीरिक त्रास सुरू झाला असून चालताना कंबर आणि गुडघ्यांच्या दुखण्यामुळे त्रास होतो. पण यापुढे पक्षाच्या प्रचाराचे काम करत राहीन.

माध्यमांशी बोलतांना त्यानी राम मंदिरावर देखील भाष्य केलं, राम मंदिरप्रकरणी न्यायालयाने आपला निर्णय दिलेलाच आहे. यामुळे परपस्पर संमतीने आता मंदिर उभारणी झाली पाहिजे, असं त्या म्हणाल्या. उमा भारती या सर्वप्रथम खजुराहो येथून खासदार म्हणून निवडून आल्या. त्यानंतर भोपाळनंतर त्या झाशीच्या खासदार आहेत. बडा मलेहरा आणि चरखारीच्या त्या आमदारही