जिथेही रॉबर्ट वाड्रा प्रचारासाठी जातील, तिथल्या जनतेने आपल्या जमीनी वाचवाव्या : स्मृती इराणी

टीम महाराष्ट्र देशा : सध्या लोकसभा निवडणूक २०१९ साठी जोरदार प्रचार सुरु आहे. कॉंग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा हेही आता प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत. ते संपूर्ण देशात प्रचार करणार आहेत. आणि त्यांच्या याचं  निर्णयावर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी टीका केली आहे.

रॉबर्ट वाड्रा यांच्यावर टीका करताना इराणी यांनी “मला फक्त इतकं म्हणायचं आहे की, जिथेही रॉबर्ट वाड्रा हे प्रचारासाठी जाऊ इच्छितात, तिथल्या जनतेने जरा सावध व्हावं आणि आपल्या जमीनी वाचवाव्या कारण त्यांचे जमिनीवर खूप प्रेम आहे,  त्यामुळे शेतकऱ्यांनी सावधान रहावे” असा खोचक टोला त्यांनी वाड्रा यांना लगावला आहे.

 

 

Loading...

दरम्यान, रॉबर्ट वाड्रा यांच्यावर लंडनमध्ये १९ लाख पाउंड म्हणजेच जवळपास १७ कोटींचा बंगला विकत घेण्यासाठी काळ्या पैशांचा वापर केल्याचा आरोप आहे. ते सध्या मनी लॉड्रिंग प्रकरणी जामीनावर बाहेर आहेत. तसेच त्यांना देश सोडण्यासाठी न्यायालयाची परवानगी घेणे आवश्यक आहे.