चक्क केंद्रीय मंत्री स्मृती इराणींना नाकारला प्रवेश

चक्क केंद्रीय मंत्री स्मृती इराणींना नाकारला प्रवेश

Kapil Sharma

मुंबई : टेलिव्हिजनवरील ‘द कपिल शर्मा शो’ (The Kapil Sharma Show) हा लोकप्रिय कॉमेडी शो आहे. या शोमध्ये अनेक सेलिब्रिटी हजेरी लावतात. मात्र केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) या शोच्या निर्मात्यांवर नाराज असल्याच्या बातम्या येत आहेत. अलीकडेच, स्मृती इराणी त्यांच्या पुस्तकाच्या प्रमोशनसाठी शोमध्ये येणार असल्याची चर्चा होती. ताज्या वृत्तानुसार, आता त्यांचा एपिसोड काही काळासाठी रद्द करण्यात आला आहे.

जेव्हा स्मृती इराणी गेटवर पोहोचल्या तेव्हा गेटकीपरला त्यांना ओळखता आले नाही, असे सांगितले जात आहे. मंत्र्यांच्या ड्रायव्हरला गार्डने थांबवून आत जाण्यास नकार दिला. ड्रायव्हर आणि गेटकीपरमध्ये बरीच वादावादी झाल्याचे वृत्त आहे, पण काही निष्पन्न झाले नाही. यानंतर संतापलेल्या केंद्रीय मंत्री शूटिंग न करताच परतल्याचं स्पॉटबॉयने दिल्याचं वृत्त आहे. स्मृती इराणी ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये त्यांच्या पुस्तकाच्या प्रमोशनसाठी जात होत्या. एपिसोडचे चित्रीकरण आज म्हणजे २४ नोव्हेंबर होणार होते, मात्र ते झाले नाही. तसेच गेटकीपर म्हणाला, “आत पाठवण्याची ऑर्डर मिळाली नाही.” यानंतर संतापलेल्या स्मृती शूट न करताच परतल्याचे म्हटले जाते.

मात्र फूड डिलिव्हरी करणारी व्यक्ती तेथे पोहोचली, त्याला गार्डने थांबवले नाही आणि तो न विचारता आत गेला. हे पाहून स्मृती इराणींना खूप राग आला आणि त्या रागाच्या भरात निघून गेल्या. या गोष्टीविषयी स्मृती यांनी काही स्पष्टीकरण दिलं नाही तसेच कपिलने (Kapil Sharma) यावर काही वक्तव्यं केलं आहे. दरम्यान, स्मृती इराणी यांच्या पुस्तकाच नाव ‘लाल सलाम’ आहे. आता हा एपिसोड कधी शूट होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, कपिल शर्मा यांचे पहा काही फोटो.

 

 

महत्वाच्या बातम्या: