पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत मिशनला केंद्रीय मंत्र्यांचा हरताळ

कृषीमंत्री राधा मोहन सिंगांचे उघड्यावर मूत्रविसर्जन व्हायरल

वेबटीम / नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र हे स्वच्छ भारतचा नारा देत आहेत, आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी ते कायम मन की बात करतात.  मात्र पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत मिशनला केंद्रीय मंत्र्यांनीच हरताळ फासल्याच दिसून येतय. केंद्रीय मंत्रीच उघड्यावर मूत्रविसर्जन करताना कॅमेरात कैद झाले आहेत. केंद्रीय कृषीमंत्री राधा मोहन सिंग एका भिंतीवर लघुशंका करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

राधा मोहन सिंग त्यांच्या कारजवळ असलेल्या एका भिंतीकडे तोंडकरुन लघवी करत आहेत, तर त्यांचे सुरक्षा अधिकारी त्यांच्याकडे पाठ फिरवून उभे आहेत. बिहारमध्ये मोतिहारी गावाच्या दौऱ्यावर असताना राधा मोहन सिंग यांनी हा प्रताप केला आहे.

You might also like
Comments
Loading...