मोदी सरकारचा मोठा निर्णय, कॅबिनेट बैठकीत तिहेरी तलाक विधेयकाला मंजुरी

talak2

टीम महाराष्ट्र देशा :  मोदी सरकारने कॅबिनेट बैठकीत तिहेरी तलाक संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारने तिहेरी तलाक विधेयकास मंजुरी दिली आहे. मोदी सरकार येत्या संसदेच्या अधिवेशनात तिहेरी तलाक विधेयक सादर करणार आहे असे  केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हंटले आहे.

माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी माध्यमांशी बोलताना म्हंटले की, कॅबिनेट बैठकीत तिहेरी तलाक विधेयकास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच जुन्याच अध्यादेशाचं रुपांतर विधेयकात करण्यात येईल. असेही त्यांनी म्हंटले.  इतकेच नव्हे तर, जम्मू काश्मीरमधील राष्ट्रपती राजवटदेखील सहा महिन्यांनी वाढवण्यात आली. असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.