त्यांनी खुशाल नक्षलवादी संघटनेत भरती व्हावे, आम्ही त्यांना गोळ्या घालून ठार मारु-हंसराज अहिर

टीम महाराष्ट्र देशा: मी रुग्णालयात येणार हे माहित असून देखील डॉक्टर रजेवर जातात. त्यांचा लोकशाहीवर विश्वास नसेल तर त्यांनी खुशाल नक्षलवादी संघटनेत भरती व्हावे, आम्ही त्यांना गोळ्या घालून ठार मारु, असं धक्कदाय आणि संतापजनक विधान केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केलं आहे.

Loading...

‘मी जनतेने निवडून दिलेला खासदार असून मी केंद्रीय राज्यमंत्रीपदावर आहे. मी इथे येणार हे माहित असूनही डॉक्टर रजेवर कसे जाऊ शकतात, त्यांचा लोकशाहीवर विश्वास नसेल तर त्यांनी खुशाल नक्षलवादी संघटनेत भरती व्हावे, आम्ही गोळ्या घालून ठार मारु, अशा शब्दात त्यांनी डॉक्टरांना सुनावले.’ या भाषेत मंत्री मोहदायांनी डॉक्टरांना झापल आहे.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रपूरमधील सरकारी रुग्णालयात सोमवारी अमृत दिनद्याल मेडिकल स्टोअरचा शुभारंभ झाला.याच उद्घाटन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या हस्ते करण्यात आले. हंसराज अहीर हे या कार्यक्रमाला येणार असतानाच रुग्णालयातील डॉक्टर रजेवर होते. याचाच संताप मोहदायांना अनावर झाला आणि असं बेताल वक्तव्य त्यांनी केलं.

1 Comment

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...