केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा साधेपणा पाहून सर्वत्र कौतुकाचा वर्षाव

nitin gadkri

नवी दिल्ली :  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कामाचे नेहमीच कौतुक केले जाते. त्यांच्या साधेपणामुळे नितीन गडकरी लोकप्रिय नेते आहेत. इतक्या मोठ्या पदावर असताना देखील ते नेहमीच सामान्य नागरीकासारखे जीवन जगत असताना अनेकदा पाहायला मिळतात. नुकताच त्यांचा एक व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला असून हे पाहून सर्वच जण त्यांचे कौतुक करत आहेत.

विमान प्रवास करण्यासाठी केंद्रीय मंत्री एखाद्या सामान्य माणसाप्रमाणे चक्क रांगेत उभे राहले आहेत. इतर नागरिकांप्रमाणे सुविधा घेत आहेत. तर खर तर केंद्रीय मंत्री म्हंटल्यानंतर वेगळी खास सुविधा देण्यात येते. मात्र त्यांनी सर्वसामान्य माणसाप्रमाणे रांगेत उभे राहिले. हे पाहिल्यानंतर तिथल्या प्रवाश्यांनाही आश्चर्य वाटले.

नितीन गडकरींचा व्हिडिओ- 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विमानातून प्रवास करण्यासाठी ते सामान्य माणसाप्रमाणे रांगेत उभे राहिले होते. विमानात बसलेल्या एका प्रवाश्याने हा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये टिपला आहे. त्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. एवढी मोठी सुरक्षा असलेले मंत्री जेव्हा सामान्य माणसांप्रमाणे रांगेत राहताना दिसत आहे.

गाड्यांचे हॉर्न ऐकण्यासाठी योग्य पद्धतीचे असले पाहिजेत असा विचार मनात आल्याने त्या मधूनच आता गाड्यांच्या हॉर्नचे आवाज हे भारतीय वाद्यांचे असावेत असा विचार आम्ही सुरु केला असून यासंदर्भात काम सुरु आहे. तसेच हॉर्नच्या आवाजामध्ये तबला, पेटी, व्हॉयलिन, बिगूल, तानपुरा, बासरी यासारख्या वाद्यांच्या आवाजाचा समावेश करण्यात येणार असून या संदर्भात आदेश काढण्यात येणार असल्याचं गडकरींनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या