माझ्या मनात पंतप्रधान होण्याचा विचार देखील येत नाही – नितीन गडकरी

नावी दिल्ली – मी भाजपचा एक सामान्य  कार्यकर्ता असून, मी कधीच पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहिलेले नाही किंवा माझ्या मनात तसा विचारही येत नसल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले. ते एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलखती बोलत होते.

दरम्यान पंतप्रधान मोदींची कार्यपद्धती, राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणि भाजपा यांच्यातील संबंध आदीबाबत त्यांनी यावेळी  माहिती दिली. मंत्रिमंडळाचे निर्णय पंतप्रधान मोदी हे एकट्याने घेतात. त्यांची एकाधिकारशाही चालते, याबाबत बोलताना गडकरी म्हणाले की, हे अत्यंत चुकीचे आहे. आमचे एक कॅबिनेट आहे. अनेकवेळा आम्ही आमचे मत कॅबिनेटमध्ये बैठकीत मांडतो. काहीवेळा आम्ही पंतप्रधानाच्या मताशी सहमतही नसतो. पण सरकार सत्तेवर आल्याच्या पहिल्या दिवसापासून जाणूनबुजून मोदींच्या कार्यपद्धतीवर अफवा पसरवण्यात येत असल्याचं गडकरी यावेळी म्हणाले.

तसचं  मला देशासाठी जे काही करता येईल ते अत्यंत प्रामाणिकपणे मी करतो. मी आतापर्यंत १० लाख कोटी रूपयांची कामे केली आहेत. पण कुठल्याही कंत्राटदाराकडून एक रूपयाही घेतलेला नाही. माझ्यामते राजकारण हे सामाजिक – आर्थिक सुधारणा करण्याचे एक माध्यम असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

You might also like
Comments
Loading...