मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची १ मे रोजी औरंगाबद येथे सभा पार पडली. या सभेत राज ठाकरे यांनी शिवाजी महाराजांचा इतिहास, शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसमुळे सुरू झालेला जातीय द्वेष, मशिदीवरील भोंगे आणि इतर काही मुद्द्यांवर भाष्य केले. यावर प्रतिक्रिया देत भोंगे उतरवायचं ठरवलं तर शिर्डीच्या मंदिरावरील भोंगादेखील उतरवावा लागेल, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले. दरम्यान, अजित पवारांच्या या वक्तव्यावर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी टीका केली आहे.
यासंदर्भात नारायण राणे यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत की, शिर्डी मंदिरावरचा भोंगाही उतरवावा लागेल. हिंदू मंदिरावरील भोंगे, हरिनाम सप्ताह, जागरण-गोंधळ, काकड आरती यांवर कारवाई करून दाखवाच. अशी कारवाई करणारा पहिला हिंदू असेल, हे आमचे दुर्दैव’, अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार जी म्हणाले आहेत, की शिर्डी मंदिरावरचा भोंगाही उतरवावा लागेल. हिंदू मंदिरावरील भोंगे, हरिनाम सप्ताह, जागरण-गोंधळ, काकड आरती यांवर कारवाई करून दाखवाच. अशी कारवाई करणारा पहिला हिंदू असेल, हे आमचे दुर्दैव!
— Narayan Rane (@MeNarayanRane) May 3, 2022
दरम्यान, ‘भोंगे उतरवायचं ठरवलं तर शिर्डीच्या मंदिरावरील भोंगादेखील उतरवावा लागेल, कारण तिथे ५ वाजता काकडा आरती सुरु होते. ग्रामीण भागात उशिरापर्यंत हरिनाम सप्ताहाचे कार्यक्रम चालतात. जागरण गोंधळाचे कार्यक्रम चालतात, यात्रा चालतात, पण काही जणांना समजून घ्यायचं नाही. फक्त राजकारण करायचं आहे’, असे काल प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना अजित पवार म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या:
- “…त्यासाठी पोलीस यंत्रणेने कठोर पावले उचला”, गृहमंत्र्यांचे आदेश
- IPL 2022 GT vs PBKS : पंजाबला चिरडण्यासाठी सुसाट गुजरात सज्ज! वाचा हेड-टू-हेड आकडेवारी
- “फडणविसांच्या रक्षणार्थ त्यांच्या अर्धांगिनी असताना तुम्ही सवाई…”, शिवसेनेचा चित्रा वाघ यांना टोला
- “हर्षदानं देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला”, अजित पवारांनी केले कौतुक
- राज ठाकरेंना अटक होणार? ; संदिप देशपांडे आक्रमक! म्हणाले, “रस्त्यावर देखील संघर्ष…”