काश्मीर समस्येसाठी नेहरुच जबाबदार ;जितेंद्र सिंह

वेब टीम ;६० -७० वर्षात काश्मीरच्या बाबतीत अनेक चुका झाल्या मात्र याची सुरुवातच नेहरूंनी केल्याची टीका केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी केली आहे तसेच जम्मू काश्मीरच्या समस्येला पूर्णपणे जबाबदार भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरुच असल्याचा आरोप देखील  सिंह यांनी केला आहे .

दिल्लीमध्ये इंद्रेश कुमार यांनी काश्मीर वर लिहलेल्या दोन पुस्तकाचं लोकार्पण केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत करण्यात आलं . यावेळी काश्मीरच्या प्रश्नासाठी पूर्णपणे नेहरुच जबाबदार असल्याचा आरोप सिंह यांनी केला . खर पाहिलं तर काश्मीरची समस्या निर्माणच व्हायला नको होती इतर संस्थानांप्रमाणे काश्मीर देखील भारतात विलीन होणे आवश्यक होते . मात्र नेहरू त्यावेळी संयुक्त राष्ट्र संघाकडे गेले ज्याची आवश्यकता नव्हती त्यामुळे काश्मीरच्या समस्येला नेहरुच जबाबदार असल्याची टीका सिंह यांनी केली .