fbpx

राहुल गांधी तर ‘हायब्रिड’, ते ब्राह्मण कसे ? भाजप मंत्री पुन्हा बरळला

टीम महाराष्ट्र देशा : वादग्रस्त विधान करण्यासाठी कुप्रसिद्ध असलेले केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे यांनी आणखी एक वक्तव्य करून नवीन वाद निर्माण केला आहे. यावेळेस त्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल गांधी ‘हायब्रिड’ असल्याचे सांगत हेगडेंनी त्यांच्यावर आक्षेपार्ह टीका केली आहे. मुस्लिम वडिलांचा आणि ख्रिश्चन आईचा मुलगा ब्राह्मण कसा असू शकतो? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी नवीन वाद निर्माण केला आहे.

एका कार्यक्रमादरम्याम संबोधित करताना हेगडेंनी हे वादग्रस्त विधान केले आहे. हेगडे म्हणाले की, त्यांना धर्माची कोणतेही जाण नाही. वडिल मुस्लिम, आई ख्रिश्चन, मुलगा ब्राह्मण… ही बाब कसे शक्य आहे? पाहा ते किती खोटे बोलत आहेत. जगातील कोणत्याही प्रयोगशाळेत अशा प्रकारचे हायब्रिड निर्माण केले जाऊ शकत नाही. पण आपल्या देशातील काँग्रेसच्या प्रयोगशाळेमध्येच केवळ हे उपलब्ध आहे असे सांगून हेगडेंनी राहुल गांधींवर निशाणा साधला.