Loksabha- पत्रकारांवर वाढत्या हल्ल्यासंर्भात ठोस उपाययोजना- हंसराज अहीर

पत्रकारांवर वाढत्या हल्ल्यासंर्भात ठोस उपाययोजना करण्यात येत असून, आरोपींवर कठोर कारवाईची तरतूद करणार असल्याचं केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आज लोकसभेत सांगितलं. पत्रकारांवरील हल्ल्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. हल्ल्यानंतर मृत्यू झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांसाठी अद्याप कोणतीही आर्थिक तरतूद केली नसून, यासंदर्भात काय तरतूद करता येईल याचा अभ्यास केला जात असल्याचं ते म्हणाले.