केंद्रीय मंत्री मंडळाची आज बैठक, मोठ्या घोषणेची शक्यता

narendra modi

नवी दिल्ली : देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या पहिल्या १० देशांच्या यादीत भारत सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर आज मोदी मंत्रिमंडळ बैठक होणार आहे. या बैठ्कीनंतर मोदी सरकार एखादी मोठी घोषणा करू शकते अशी बातमी हाती येत आहे. लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्याचे तीन टप्प्यात विभाजन करण्यात आलेले आहे व त्याला अनलॉक -1 असं नाव देण्यात आलं आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोरोना ते युद्धाच्या या घोषणेत काही महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक बदल केले जाऊ शकतात. याद्वारे बँक जाम, कर्जमाफी अशी काही महत्त्वपूर्ण पावले उचलता येतील. सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने काही महत्वाची पावलं उचलली जातील अशी देखील शक्यता आहे.

दरम्यान, भारतामध्ये रविवारी रात्रीपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार कोरोनाचे १ लाख ९० हजार ६०९ रुग्ण आहेत. यासोबत भारताने फ्रान्सला मागे टाकलं आहे. फ्रान्समध्ये करोनाचे १ लाख ८८ हजार ८८२ रुग्ण असून भारताने फ्रान्सला मागे टाकलं असून नवव्या क्रमांकावरुन सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे.

पहिल्या क्रमांकावर अमेरिका अद्याप कायम असून अमेरिकेत करोनाचे १८ लाख रुग्ण आहेत. यानंर ब्राझील आणि रशियाचा क्रमांक आहे. ब्राझीलमध्ये करोनाचे पाच लाख तर रशियात करोनाचे चार लाख रुग्ण आहेत.

पीपीई किट घोटाळा : अवघ्या 43 सेकंदाची ऑडीओ क्लिप व्हायरल, भाजप अध्यक्षांचा राजीनामा

राजकारण विसरून सगळ्यांना एकत्र येऊन काम करावं लागेल – खा. संजय राऊत

…तर ही वेळ आली नसती; अमित शाहांची कबुली