SC/ST आरक्षण १० वर्षांनी पुन्हा वाढणार, केंद्रीय मंत्रिमंडळाचा महत्वपूर्ण निर्णय

टीम महाराष्ट्र देशा : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या आरक्षणाबाबत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. लोकसभा आणि राज्यांमधील विधानसभेसाठी अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आरक्षण १० वर्षांनी पुन्हा वाढवण्यात आले आहे. याआधी हे आरक्षण २००९मध्ये वाढवण्यात आले होते.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थित मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.केंद्र सरकार हे दलितविरोधी असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून होत होता. अशात हे आरक्षण विधेयक मंजूर करणे मोदी सरकारसाठी अत्यंत आवश्यक आहे. शिवाय कुणी या विधेयकाला विरोध करेल अशीही स्थिती नाही. म्हणूनच, हे आरक्षण विधेयक मंजूर होईल हे निश्चित असल्याचे मानले जात आहे.

Loading...

दरम्यान भारतीय राज्यघटनेच्या कलम ३३४ नुसार लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये एससी, एसटी आरक्षण लागू करण्यात आले आहे. परंतु, त्यावेळी हे राजकीय आरक्षण १० वर्षांसाठी लागू करण्यात आले होते. त्यानंचर १० वर्षांनी ते आणखी १० वर्षांसाठी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. या पूर्वी सन २००९ मध्ये यूपीए सरकारने हे आरक्षण १० वर्षांसाठी वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता केंद्र सरकारने आरक्षणाच्या कालमर्यादेला मंजुरी दिल्यास ते जानेवारी २०३० पर्यंत लागू होणार आहे.

महत्वाच्या बातम्या

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
कोरोनाविरोधात लढण्यासाठी रिलायंस कंपनीने घेतला 'मोठा' निर्णय; केली तब्बल 'इतक्या' कोटींची मदत
#Corona : कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटीव्ह, इंस्टा अकाऊंटवरून केली भावनिक पोस्ट
दारुड्यांसाठी अत्यंत वाईट बातमी...दुकाने सुरु होण्यासाठी पहावी लागणार आणखी वाट
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
कोरोना ( कोव्हिड-१९ ) संसर्गाची भिती कोणाला ?
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?