fbpx

union-budget-2019 : जलशक्ती या नवीन मंत्रालयातंर्गत हर घर जल ही योजना आणणार

टीम महाराष्ट्र देशा : नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिला केंद्रीय अर्थसंकल्प २०१९ आज सादर होत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत अर्थसंकल्प सादर करत आहेत. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यानंतर अर्थसंकल्प मांडणाऱ्या त्या देशाच्या दुसऱ्या महिला अर्थमंत्री आहेत. तर, पूर्णवेळ अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प मांडणाऱ्या त्या देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री आहेत.

union-budget-2019 live updates

– भाड्याने घरे घ्यायला प्रोत्साहन देण्यासाठी लवकरच आदर्श भाडे कायदा आणणार आहोत.

– जलशक्ती या नवीन मंत्रालयातंर्गत हर घर जल ही योजना आणणार.

– प्रत्येकाला पिण्याचं पाणी देण्याची योजना आहे.

– पाण्याचं नियोजन करण्यासाठी देशभर जलशक्ती अभियान राबविणार आहोत.

– रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठीही प्रयत्न होतील

– यावर्षी नवीन ४ दुतावास उघडण्याची योजना

– एसएचजीच्या प्रत्येक महिलेला ५ हजारांचा ओव्हरड्राफ्ट

– भारतीय पासपोर्ट असणाऱ्या एनआरआयंना आधारकार्ड मिळणार

– महिला सशक्तीकरण गरजेचे आहे. कारण, एका पंखाद्वारे चिमणी उडाण भरू शकत नाही.

– ‘नारी से नारायणी’ हाच सरकारचा नारा

– महिलांची परिस्थिती सुधारली नाहीतर विकास शक्य नाही