fbpx

Budget 2019 ; सरकारची मोठी घोषणा,40 हजार रुपयांपर्यंतचे व्याज करमुक्त होणार

टीम महाराष्ट्र देशा- प्रभारी अर्थमंत्री पियूष गोयल यांनी मोदी सरकारचा अर्थसंकल्प सादर केला. निवडणुकांपूर्वी मध्यमवर्गाला, शेतकऱ्यांना, कामगारांना,महिलांना आकर्षित करण्यासाठी आकर्षक घोषणांचा पाऊस पाडला आहे . लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून संपूर्ण वर्षाचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवत सरकारकडून अनेक नव्या योजना जाहीर केल्या आहेत.

बॅँका तसेच पोस्ट ऑफिसेसमधील ठेवींवरील व्याजावरील करकपातीची मर्यादा 10 हजार रूपयांवरून 40 हजार रुपयांवर नेत असल्याची घोषणा केली आहे.सध्या बॅँकांमधील ठेवींवरील व्याज वर्षाला 10 हजार रुपयांपेक्षा अधिक झाल्यास त्यावर उद्गमी करकपात केली जात होती. ज्या ठेवीदारांचे उत्पन्न करपात्र नाही, अशांना दरवर्षी बॅँकेला 15 जी/एच हा फॉर्म भरून द्यावा लागत होता. आत ही मर्यादा 40 हजार रुपयांवर नेली गेल्यामुळे ठेवींचे प्रमाण वाढून बॅँकांना दिलासा मिळण्याची मोठी शक्यता आहे.

दरम्यान,अर्थसंकल्प सर्वसमावेशक असल्याचं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. न्यू इंडियाचं स्वप्न पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प असल्याचं सांगत योगींनी अर्थसंकल्पावर स्तुतिसुमने उधळली आहेत.

दरम्यान,निवडणुकांपूर्वी मध्यमवर्गाला, शेतकऱ्यांना, कामगारांना,महिलांना आकर्षित करण्यासाठी आकर्षक घोषणांची शक्यता वर्तवण्यात येत होती. प्रामाणिक करदात्यांचे पियूष गोयल यांनी कौतुक केले खरे मात्र त्याला दिलासा देण्यासाठी सध्याच्या टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये. सध्या 2.5 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त असून ते बदलण्यात आलेले नाहीये.