fbpx

राज ठाकरेंनाच शिवसेनेत का घेत नाही? शिवसैनिकांचा ‘रोकठोक’ सवाल

raj-,-uddhav-thackeray-

मुंबई : मुंबईत शिवसेनेतील अंतर्गत वाद शिगेला पोहचला आहे. राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना शिवसेनेत घेण्यापेक्षा राज ठाकरेंनाच शिवसेनेत का घेत नाही? असा रोकठोक सवाल नाराज शिवसैनिक विचारू लागले आहेत.

ईशान्य मुंबईत मनसेतून शिवसेनेत आलेल्या कार्यकर्त्यांना पद वाटल्यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे. ‘शिवसेनेला निष्ठावंतांची गरज नाही, चार घरं फिरुन आलेल्या लोकांची पक्षाला गरज आहे, असं म्हणत ईशान्य मुंबईची ‘नवनिर्माण शिवसेना’ असं नाव देत नाराज शिवसैनिकांनी घाटकोपरमध्ये बॅनरबाजी केली. ‘राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना घेण्याऐवजी राज ठाकरेंनाच पक्षात का घेत नाही?’ असा सवाल शिवसैनिकांनी होर्डिंगच्या माध्यमातून विचारला आहे.

mns vs shivsena

काय लिहिलंय पोस्टरवर?

ईशान्य मुंबई विभाग प्रमुख मा. श्री. राजेंद्र राऊत साहेब यांच्या धोरणानुसार ईशान्य मुंबई विभाग क्र. 8 च्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची उपविभाग प्रमुख, विधानसभा संघटक, सहसंघटक व शाखाप्रमुख यांची यादी नुकतीच जाहीर झाली. त्याचवेळी लक्षात आले की, यातील नियुक्त्या करण्यात आलेले बरेच जण अनेक पक्ष फिरुन संघटनेच्या विरोधात निवडणूक लढवून किंवा विरोधात काम करणाऱ्यांना मा. विभाग प्रमुखांनी संघटनेची सन्मानाची पदे बहाल केली आहेत. याचा अर्थ असा होतो की सध्या शिवसेनेत या पदांच्या लायकीचा निष्ठावंत शिवसैनिक या पदाच्या लायकीचे नाही. त्यामुळे मा. राज ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसून आलेल्या लोकांना महत्त्वाचे पदे बहाल करण्यात आली. त्या ऐवजी मा. राज ठाकरेंनाच शिवसेनेत का घेत नाही?

इतर पक्षातून आलेल्या पदाधिकाऱ्यांची सध्याची पदे व पूर्वीचे पक्ष पुढीलप्रमाणे

मा. बाबू दरेकर (उपविभागप्रमुख) – पूर्वी – मनसे
मा. विजय पडवळ (उपविभागप्रमुख)- पूर्वी – मनसे भाजप
मा. ज्ञानेश्वर वायाळ (विधानसभा संघटक) – पूर्वी – मनसे
मा. बाबू साळुंखे (शाखाप्रमुख) – पूर्वी – मनसे/राणे समर्थक
मा. शिवाजी कदम (वय वर्ष 65 शाखाप्रमुख) पूर्वी – मनसे
मा. नाना ताटेले (शाखाप्रमुख) – पूर्वी – राष्ट्रवादी-मनसे-भाजप
मा. शरद कोथरे (शाखाप्रमुख) – पूर्वी – मनसे

1 Comment

Click here to post a comment