हिमाचल प्रदेशमध्ये दुर्दैवी घटना, इमारत कोसळून ६ जवान आणि एका नागरिकाचा मृत्यू

blank

टीम महाराष्ट्र देशा : हिमाचल प्रदेशच्या सोलन या ठिकाणी इमारत कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून मृतांमध्ये 6 लष्करी जवानांचा समावेश आहे.

रविवारी सोलनमधील कुमारहट्टी या ठिकाणी इमारत कोसळली. त्यानंतर ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर बचाव कार्यामध्ये ७ जणांना वाचवण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आले आहे. सध्या या ठिकाणी एनडीआरएफच्या टीमने मदत आणि बचाव कार्य सुरु केले आहे. लष्कराचीही मदत घेण्यात येते आहे.

सोलनचे उपायुक्त के. सी चमन यांनी काही वेळापूर्वी घटनास्थळी भेट दिली. यावेळी ते म्हणाले की, आत्तापर्यंत १७ जवानांची सुटका करण्यात यश आलं आहे. तसेच या दुर्घटनेत ६ जवान आणि १ नागरिकाचा मृत्यू झाला आहे. तर अजून काही जण ढिगाऱ्या खाली अडकल्याची भीती आहे.