‘मोदी सरकारच्या गलथानपणामुळे देशातील बेरोजगारी ४५ वर्षातील उचांकीवर’ – बाळासाहेब थोरात

narendra modi

मुंबई : देशातील युवकांना दरवर्षी २ कोटी नवीन रोजगार देण्याचे खोटे अश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले. हे अश्वासन त्यांनी पाळले नाही उलट अनेकांचा रोजगार हिरावला आहे. म्हणून मोदींचा वाढदिवस बेरोजगार दिवस म्हणून पाळण्याचे आंदोलन काँग्रेसतर्फे केले जात आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७२ व्या वाढदिवसाला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी ट्विट करत बेरोजगारांच्या समस्या मांडल्या आहे.

महसूलमंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी याबाबत ट्विट केले आहे. ‘दरवर्षी २ कोटी नविन रोजगार देण्याचे खोटे आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या नरेंद्र मोदी यांच्या ७ वर्षाच्या सत्ताकाळात नविन रोजगार मिळणे तर दूरच आहे. अनेकांचे रोजगार जात आहेत. मोदी सरकारच्या गलथानपणामुळे बेरोजगारी गेल्या ४५ वर्षातील उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे.’ असे काँग्बारेस निते बाळासाहेब  थोरात यांनी म्हटले आहे.

देशातील युवकांना दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचे खोटे आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या नरेंद्र मोदी यांनी ७ वर्षात हे आश्वासन पाळले नाही. रोजगार निर्मिती दूर राहिली जे रोजगार होते ते ही गेले आणि ४५ वर्षातील सर्वात जास्त बेरोजगारीचा उच्चांक मोदींच्या काळात झाला. युवकांची स्वप्नं धुळीस मिळवून त्यांचे भविष्य अंधकारमय करणाऱ्या मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी युवक काँग्रेस १७ सप्टेंबरला पंतप्रधान मोदींना आंदोलनरुपी वाढदिवसाची भेट देणार आहे. असे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या