रद्द करण्यात आलेली नांदेड-पनवेल एक्स्प्रेस पूर्ववत; मार्ग बदलून धावणार!

huzur sahib nanded railway

नांदेड : मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. नांदेड ते पनवेल एक्स्प्रेस (०७६१४) १४ ते २७ ऑक्टोबर आणि पनवेल ते नांदेड एक्स्प्रेस (०७६१३) १५ ते २८ ऑक्टोबर दरम्यान रद्द करण्यात आली होती. परंतु, जनतेची मागणी लक्षात घेवून ही रेल्वे रद्द करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने बदलला आहे. आत्ता दिनांक १४ ते २८ ऑक्टोबर दरम्यान ही रेल्वे पूर्वी प्रमाणेच परंतु बदलेल्या मार्गाने धावेल.

नांदेड ते पवनेल एक्स्प्रेस (०७६१४) पूर्वीप्रमाणेच नांदेड येथून सुटेल, परंतु दिनांक १४ ते २७ ऑक्टोबर दरम्यान ही रेल्वे बदलेल्या मार्गाने म्हणजेच लातूर रोड, कुर्डूवाडी , मिरज, पुणे या मार्गाने धावेल. पवनेल ते नांदेड एक्स्प्रेस (०७६१३) पूर्वी प्रमाणेच पनवेल येथून सुटेल. परंतु दिनांक १५ ते २८ ऑक्टोबर दरम्यान ही गाडी बदलेल्या मार्गाने म्हणजेच पुणे, मिरज, कुर्डूवाडी, लातूर रोड या मार्गाने धावेल.

१४ ते २८ ऑक्टोबर दरम्यान मध्य रेल्वे मध्ये सोलापूर विभागातील भालवानी ते वाशिंबे दरम्यान २६.३३ किलोमीटर चे दुहेरीकरणाचे कार्य पूर्ण करण्याकरिता नॉन इंटर लॉक वर्किंग हाती घेण्यात येणार आहे. यामुळे काही गाड्यांवर याचा परिणाम झाला आहे. यापैकी नांदेड विभागातुन धावणारी पनवेल एक्स्प्रेस वरील उल्लेखिलेल्या कालावधीत मार्ग बदलून धावेल हे प्रवाशांनी लक्षात घावे, असे आवाहन दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील जनसंपर्क विभागाने केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या