fbpx

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा आर्थिक सल्लागार पोलिसांच्या हाती

dawood ibrahim

टीम महाराष्ट्र देशा : गेल्या अनेक वर्षांपूर्वी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम देशाबाहेर पळाला आहे. परंतु त्याचे भारतातल्या अंडरवर्ल्ड माफियांशी असलेले संबंध पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा आर्थिक सल्लागार आणि दाऊदच्या अनेक गुप्त गोष्टी माहित असलेला त्याचा विश्वासू सहकारी जबीर मोतीला लंडन येथून अटक करण्यात आली आहे.

लंडनच्या चारिंग क्रॉस पोलिसांनी मोतीला शुक्रवारी हिल्टन हॉटेलमधून अटक केली आहे. आणि त्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आलं. जबीर याच्याकडे पाकिस्तानचे नागरिकत्त्व असून त्याचा कराचीमध्ये मोठा बंगला आहे.

मोती हा इंग्लंड, यूएई आणि इतर देशांमध्ये दाऊदचं कामकाज सांभाळतो. भारतानं मोतीला अटक करण्याची मागणी केली होती. मोतीवर ड्रग्ज तस्करी, खंडणी आणि इतर गुन्हांमध्ये गंभीर आरोप आहेत. जबीर सिद्दीक ऊर्फ जबीर मोती अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा विश्वासू सहकारी आहे. तो दाऊद आणि डी कंपनीसाठी पैशासंबंधित व्यवहार पाहतो. पाकिस्ताननंत्याला नागरिकत्व बहाल केलं आहे. दाऊदची पत्नी महजबीचा सुद्धा त्याच्यावर फार विश्वास आहे. दाऊद सध्या कराचीमधील क्लिफ्टन भागात राहतो.

मोठी बातमी : डॉ दाभोळकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्याला पाच वर्षांनंतर अटक

डॉ. खासदार श्रीकांत शिंदे जपतायेत सामाजिक जाणिवा…