व्यासपीठ : लैंगिक शिक्षण समजून घेताना

sex education in school

“SEX IS TOO BEAUTIFUL TO BE MADE UGLY BY IGNORANCE, GREED, AND LACK OF RESPONSIBILITY”

लैंगिकता म्हणजे काय ? SEX, स्त्री पुरुष ओळखण्याचे माध्यम का स्त्री पुरुष मधील लैंगिक संबंध? स्त्री पुरुषातील लैंगिक संबंध / संभोग म्हणजे लैंगिकता असेच समजले जाते परंतु फक्त शारीरिक संबंध म्हणजेच लैंगिकता नाही. आपल्या भारतात लैंगिक शिक्षणाबद्दल खूप गैरसमज आहेत . लैंगिकता शब्दाचा उच्चार म्हणजे काही तरी गुन्हा किंवा संस्कारहीन असल्या सारखे समजले जाते. अशा ठिकाणी लैंगिक शिक्षण ते पण शाळेत कसे दिले जाईल? जेथे सरस्वतीचा वास आहे, जेथे विद्या ग्रहणाचे पवित्र काम केले जाते भारतीय संस्कृती , संस्कार शिकवले जाते तिथे असले अपवित्र शिक्षण देऊन आपली भारताची भावी पिढी बिघडवण्याच काम कस करायच? हि वेस्टर्न संस्कृती आहे आपल्याकडे असे चालत नाही त्या पेक्षा योग शिक्षण दया असं या विरोध करणाऱ्या लोकांच मत आहे.

लैंगिक शिक्षणात सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक व मानसिक संदर्भ देखील असतात. लैंगिक शिक्षणात सकारात्मक दृष्टिकोन, शारीरिक, मानसिक व भावनिक बदल तसेच एकमेकांच्या विचाराप्रती आदरभाव, परस्पर संबंध, स्त्री पुरुषातील नाते संबंध , कौटुंबिक जबाबदाऱ्या तसेच स्त्री पुरुषाची कर्तव्ये इत्यादींचा समावेश होतो. लैंगिकते बद्दलची जबाबदारी जर दोघांमध्ये नसेल तर मानवी लैंगिक जीवन आणि पशूंच्या लैंगिक जीवनात काय फरक राहणार ?

मुल-मुली जेंव्हा वयात येतात तेंव्हा त्यांच्या शरीरात काही बदल होतात त्यामुळे त्यांची मानसिकता सुद्धा बदलत जाते. स्टॅनले हॉल ने या वयाला म्हणजेच कुमारवस्था ला ‘The period of great stress, strain, storm and strife’ असे म्हणले आहे. आपल्या शरीरात होणारे बदल कशामुळे होतात ? का होतात ? मला जे होतंय ते इतरां सोबत पण होत का फक्त माझ्या सोबत होतंय ? इतके सारे प्रश्न त्यांच्या मनात येतात. हे प्रश्न आपल्या संस्कार किंवा भीतीने ते आपल्या पालकांना , मोठ्या भाऊ बहिणीला विचारू शकत नाही. अशावेळी त्यांना आपले समवयस्क मित्र मैत्रिणी जवळ वाटत असतात एकमेकांना या विषयी चर्चा करू लागतात. इंटरनेट , मॅगझीन, T.V सिरिअल्स , सिनेमा यातून जी अर्धी माहिती मिळालेली असते ती माहिती देऊ लागतात. आता जी महिती त्यांनी मिळवलेली असते ती शास्त्रीय दृष्ट्या योग्य तसेच पूर्ण खरी असते असे नाही, पैसे कामविण्यासाठी टी आर पी वाढविण्यासाठी चॅनल्स वाट्टेल ते करतात. या सर्व गोष्टींचा भावी पिढी अंधानुकरण करते. काही वेळा गैरमार्गाचा अवलंब करते .आपण आता मोठे झालो आहोत आपण चुकत नाही असे त्यांना वाटत असते. यातूनच बलात्कार, छेड छाड , ऍसिड हल्ले सारखे कृत्य समोर येतात.

मुलांच्या मनातील या प्रश्नांची उत्तरे त्यांच्या पालकांकडून किंवा शिक्षकांकडून मिळाली तर असे विघातक कृत्य होणार नाही. कॉन्व्हेंट स्कूल मध्ये लैंगिक शिक्षण थोड्या प्रमाणात का होईना पण दिले जाते या विरुद्ध एखाद्या वस्तीच्या ठिकाणी असलेल्या शाळेत याचे शिक्षण देताना विचार केला जातो विद्यार्थी काय म्हणतील? त्यांचे पालक काय म्हणतील? याचे काही दुष्परिणाम झाले तर संस्कारा विरुद्ध काम चालू आहे म्हणून शाळेचं नुकसान कोणी केलं तर कोण जबाबदार राहणार ? अशी या शिक्षकांची भूमिका असते,परिणामी येथे पूर्णपणे दुर्लक्ष केले जाते..

पण लैंगिक शिक्षण योग्य वयात योग्य मार्गदर्शकाकडून दिले गेले तर या नव्या पिढीला योग्य दिशा मिळते . यातूनच एक सकारत्मक भूमिका व भावना निर्माण होते. लग्ना आधी लैंगिक संबंध ठेवावे का नाही? लग्नानंतर जोडीदारा सोबत एकनिष्ठ राहणे , लैंगिक वर्तन , शारीरिक, मानसिक बदल तसेच भिन्न लिंगी व्यक्तीच्या मनाचा आदर करणे इत्यादी नैतिकता शिकता येते, संस्कारिक , मानसिक संतुलन राखले जाते व एक नैतिक, जबाबदार पिढी उदयास येईल.
“So say YES to SEX EDUCATION.”

लेखिका

स्वप्निका नयनसिंग बायस
Msw student (tmv)
Solapur.