Cheque- चेकवरील ‘त्या’ 23 डिजिटचा अर्थ काय?

कॅशलेसमुळे चेकचा वापर जास्त वाढला आहे. चेकवरील काही गोष्टी सर्वानाच माहिती असतात. जसं की, रक्कमेचा आकडा, सही, नाव, चेक नंबर पण यावितिरिक्त चेकवर 23 डिजीट असतात. पण याचा अर्थ आपल्याला माहिती नसतो. त्यामुळे आज जाणून घेऊया चेकवरील 23 डिजीटचा अर्थ काय असतो ते…
? चेकवर सर्वात खाली दिलेल्या एकूण नंबर पैकी सुरुवातीचे 6 डिजीट म्हणजे चेक नंबर असतो.
? त्यापुढील 9 डिजीट हे MICR (Magnetic Ink Corrector Recognition) कोड असतो. या नंबरमुळे चेक कोणत्या बँकेतून जारी झालाय हे समजते.
? पुढील 6 डिजीट नंबर हे बँक अकाऊंट नंबर असतात. हा नंबर अनेक चेक बुक्समध्ये असतो.
? अखेरचे 2 डिजीट हे ट्रान्झॅक्शन आयडी असतात.