खडसे नरमले : गिरीश महाजनांच्या नेतृत्वात काम करण्यास खडसे तयार!

जळगाव : माजी मंत्री एकनाथ खडसे आणि जलसंपदा मंत्री गिरिश महाजन यांच्या वाद संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे.मात्र खडसे यांनी नारमाईची भूमिका घेतली असून जळगाव जिल्ह्यातील या दोन बड्या नेत्यांमध्ये असलेला वाद संपविण्याची चिन्हे आता दिसू लागली आहेत.

खडसे यांनी महापालिका निवडणुकीबाबत शुक्रवारी संध्याकाळी त्यांनी निवासस्थानी पत्रकारांसोबत वार्तालाप केला. सध्या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे जिल्ह्याचे नेते आहेत. मी नेता नाही. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास मी तयार आहे असं म्हणत खडसे यांनी मनोमिलनाचे संकेत दिले आहे. मात्र हे करीत असताना वाईट प्रवृत्तींना साथ देणार नाही, असा इशारा माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दिला.

You might also like
Comments
Loading...